Netflix कडून iOS 16 वर चालणार्या iPhones, iPads चा सपोर्ट होणार बंद; पहा कोणकोणती Devices होणार प्रभावित!
Netflix किंवा Apple कडून मात्र नेमका हा सपोर्ट कधी काढला जाणार हे सांगण्यात आलेलं नाही.
Netflix ने दिलेल्या माहितीनुसार, आता त्यांच्याकडून iOS 16 आणि iPadOS 16 वर चालणार्या iPhones आणि iPads चा सपोर्ट बंद केला आहे. त्यामुळे आता या फोन आणि आयपॅड वर नेटफ्लिक्स वापरता येणार नाही. "आम्ही Netflix ॲप अपडेट केले आहे! लेटेस्ट व्हर्जन वापरण्यासाठी, iOS 17 किंवा नंतरचे व्हर्जन अपडेट करा” जेव्हा ते नवीन व्हर्जनवर स्ट्रीमिंग सेवा ॲप अपडेट करतात. iOS 16 वर असलेले Netflix युजर्स ॲप वापरू शकतात परंतु त्यांना कोणतेही bug fixes आणि security अपडेट्स मिळणार नाहीत.
दरम्यान या अपडेट मुळे iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 Plus, तसेच iPad Pro first-generation आणि iPad 5 मध्ये नेटफ्लिक्स वापरता येणार नाही. यामध्ये iOS 17 देखील अपडेट होणार नाही. नक्की वाचा: Apple iOS 18 Release Date: आयफोन 16 सिरीजनंतर आता समोर आली ॲपल आयओएस 18 ची रिलीज डेट; जाणून घ्या कधी व कोणत्या युजर्ससाठी होणार उपलब्ध.
Netflix किंवा Apple कडून मात्र नेमका हा सपोर्ट कधी काढला जाणार हे सांगण्यात आलेलं नाही. जुलै महिन्यात अॅपल कडून दिलेल्या माहितीनुसार, iPhone X हा vintage product आहे. परंतू Apple Stores आणि Apple Authorized Service Providers विंटेज प्रोडक्ट्सच्या दुरुस्तीची ऑफर आणखी दोन वर्षांपर्यंत सुरू ठेवतील. पण ही सेवा केवळ उपलब्ध भागांसाठी असेल. iPhone चे पुढील प्रमुख सॉफ्टवेअर अपडेट iOS 18 हा 16 सप्टेंबर रोजी उपलब्ध झाले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)