My Talking Tom Friends गेम आता अॅनरॉईड आणि आयओएस वर देखील उपलब्ध; 6 विविध कॅरेक्टर्ससह घ्या गेमचा आनंद
या नव्या व्हर्जनचे नाव My Talking Tom Friends असे आहे. हा गेम अॅनरॉईड आणि आओएस या प्लॅटफॉर्मवर आता उपलब्ध झाला आहे.
लहान मुलांचा आवडता आणि प्रसिद्ध 'My Talking Tom' या गेमचे नवे व्हर्जन लॉन्च झाले आहे. या नव्या व्हर्जनचे नाव My Talking Tom Friends असे आहे. हा गेम अॅनरॉईड (Android) आणि आओएस (iOS) या प्लॅटफॉर्मवर आता उपलब्ध झाला आहे. हा एक व्हर्च्युअल पेट गेम असून याला आऊटफीट 7 लिमिडेट डेव्हलपर्सने तयार केला आहे. या गेमसह आऊटफीट 7 (Outfit 7) च्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 23 गेम्स झाले आहेत. यामध्ये My Talking Tom, My Talking Angela, My Talking Hank आणि My Talking Tom या गेम्सचा समावेश आहे. त्यात आता My Talking Tom Friends ची भर पडली आहे. विशेष म्हणजे या गेममध्ये युजर्सला 6 कॅरेक्टर्स एकत्र मिळतील.
'My Talking Tom Friends' गेम युजर्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअर वरुन फ्री मध्ये डाऊनलोड करु शकता. आतापर्यंत हा गेम फक्त प्री रजिस्टर करणाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. या गेमची माहिती मिळताच 1.3 कोटी लोकांनी या गेमचे प्री रजिस्ट्रेशन केले आहे. कंपनीच्या इतर गेम्स प्रमाणे हा गेम देखील खूप मजेशीर असून लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही त्याचा आनंद घेता येईल.
या गेममध्ये Tom, Angela, Hank, Ben, Ginger आणि Becca हे 6 कॅरेक्टर्स आहेत. हे 6 कॅरेक्टर्स ओपन आणि स्क्रोल होणाऱ्या घरामध्ये फिरत राहतील आणि प्लेअर्संना त्यांच्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे. या सर्व कॅरेक्टर्संना एकत्र येऊन जेवण बनवणे, पेटिंग, गार्डनिंग यांसारख्या विविध अॅक्टीव्हीटीज करायचा आहेत. यामध्ये प्लेअर्संना शॉपिंग करण्याचा देखील ऑप्शन दिला आहे. गेम्समधील कॅरेक्टर्संना शॉपिंग दरम्यान खाण्या-पिण्याच्या गोष्टी आणि इतर काही गोष्टी देखील मिळतील. या गेमची साईज 85 MB इतकी असून गुगल प्ले स्टोअरवरीत 50 लाखांहून अधिक जणांनी डाऊनलोड केला आहे. तुम्ही देखील आता अॅनरॉईड आणि आयओएस या प्लॅटफॉर्मवर या गेमचा आनंद घेऊ शकता.