गुगल मॅपवरुन Mumbai Flood ची माहिती 'या' पद्धतीने मिळवा
तसेच पूर्वीपेक्षा आता गुगल मॅप अधिक वेगवान गतीने काम करते.
गुगल मॅप (Google Map) मध्ये गेल्या काही काळापासून युजर्सच्या सोयीनुसार बदल केले जात आहेत. तसेच पूर्वीपेक्षा आता गुगल मॅप अधिक वेगवान गतीने काम करते. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचे असल्यास किंवा रस्ता चुकल्यास गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही योग्य ठिकाणी पोहचू शकता. त्याचसोबत युजर्सला त्याच्या मोबाईलवरील गुगल मॅपवरुन त्याच्या नजीकच्या किंवा इतर रेस्टॉरंटची माहितीसुद्धा मिळते.
मात्र आता राज्यात पडत असलेल्या मुसधार पावसामुळे काही सखल भागात पाणी साठते. अशा परिस्थितीत व्यक्तीला एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाणे कठीण जाते. त्यामुळे आता गुगल मॅपवरुन मुंबईतील पुरासंबंधित (Mumbai Flood) माहिती मिळणे सोपे होणार आहे. तर आता 'या' पद्धतीने मुंबईतील पुराची स्थिती कोठे आहे याची माहिती मिळवा.
-सर्वात प्रथम तुमच्या स्मार्टफोनवरील गुगल मॅप अॅप सुरु करा. त्यानंतर Mumbai Flood या ऑप्शनवर क्लिक करा. हे ऑप्शन तुम्हाला अॅपच्या वरच्या बाजूस दाखवलेले आहे.
-त्याचसोबत तुम्हाला Share Location आणि Navigation Impact नावाचे दोन ऑप्शन दाखवले जातील. त्यानुसार Navigation Impact या ऑप्शनमध्ये Report Road Closure असा दुसरा ऑप्शन दाखवला जाईल. त्यानुसार तुम्ही मॅप व्हूवनुसार कुठे पुराची स्थिती आहे हे तपासून पाहू शकता.
(हेही वाचा-Google Maps वर समजणार ट्रेन, बसमधील गर्दीचा अहवाल, जागा तपासून करा आपला प्रवास प्लॅन)
तसेच जर तुम्हाला एखादी तारीख किंवा वेळ माहिती असल्यास ते सुद्धा गुगल मॅपच्या या ऑप्शनमध्ये टाकून त्यावेळची स्थिती पाहू शकता. मात्र तुम्हाला त्यासाठी योग्य कारण सांगावे लागणार आहे.