DigiLocker: डिजीलॉकरवर असलेली सर्व कागदपत्रे वैध, डिजीलॉकरचे स्पष्टीकरण

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (Ministry of Road Transport and Highways of India) द्वारा परिपत्रक प्रसिद्ध करुन आगोदरच स्पष्ट करण्यात आले आहे की, डिजीलॉकर (DigiLocker) हे पूर्णपणे वैध आणि कायदेशीर आहे.

DigiLocker (PC - google play)

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (Ministry of Road Transport and Highways of India) द्वारा परिपत्रक प्रसिद्ध करुन आगोदरच स्पष्ट करण्यात आले आहे की, डिजीलॉकर (DigiLocker) हे पूर्णपणे वैध आणि कायदेशीर आहे. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि डिजीलॉकरवर उपलब्ध इतर कागदपत्रे या अंतर्गत वैध पुरावा दस्तऐवज म्हणून परस्पर प्रतिनिधी मान्यता प्राप्त आहेत, अशी माहिती डिजीलॉकरने दिली आहे.

उत्तर प्रदेशच्या वाहतूक पोलिसांमधील एका कर्मचाऱ्यावर आरोप करण्यात आला आहे की, त्याने डिजीलॉकरवर उपलब्ध असलेली कागदपत्रे वैध मानण्यास नकार देत एका व्यक्तीवर कारवाई केली. वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याने कारवाईअंतर्गत सदर व्यस्तीस 7500 रुपयांचा दंडही आकारला. या प्रकाराबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांतून छापून आल्यानंतर डिजीलॉकर वैध आहे किंवा नाही याबाबत जोरदार चर्चा रंगली. यावर स्वत: डिजीलॉकरनेच ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

ट्विट

डिजीलॉकरने काय म्हटले?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 8 ऑगस्ट 2018 रोजी कढलेल्या एका परिपत्रकाचा (क्रमांक RT-11036/64/2017-MVL दिनांक 08-08-2018) दाखला देत म्हटले आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्रे आणि डिजीलॉकरवर उपलब्ध इतर कागदपत्रे या अंतर्गत वैध पुरावा दस्तऐवज म्हणून कायदेशीररित्या मान्यताप्राप्त आहेत. ही सर्व कागदपत्रे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या अन्वये कायदेशीर आहेत.