WhatsApp ने लॉन्च केले Money Heist Animated Stickers; डाऊनलोड कसे कराल? वापरायचे कसे? इथे घ्या जाणून
नेट्फ्लिक्स (Netflix) वरील लोकप्रिय शो Money Heist च्या पाचव्या सीझनच्या पार्श्वभूमीवर हा खास स्टिकर्स पॅक लॉन्च करण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप (WhatsApp) कडून नवं स्टिकर पॅक (Sticker Pack) लॉन्च करण्यात आलं आहे. त्याला Sticker Heist असं नाव देण्यात आलं आहे. नेट्फ्लिक्स (Netflix) वरील लोकप्रिय शो Money Heist च्या पाचव्या सीझनच्या पार्श्वभूमीवर हा खास स्टिकर्स पॅक लॉन्च करण्यात आला आहे. फेसबूकच्या मालकीच्या असलेल्या व्हॉट्सअॅपने 'Sticker Heist' हा अॅनिमेटेड स्टिकर्स पॅक लॉन्च करत चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. (नक्की वाचा: The Money Heist Anthem: मनी हाईस्ट चे अँथम सॉंग रिलीज; अनिल कपूर, श्रुति हसन, राधिका आपटे यांच्यासह 'या' कलाकरांची वर्णी (Watch Video)).
व्हॉट्सअॅप वर हा स्टिकर पॅक वापरणं सोप्प आहे. Android आणि iOS वरील व्हॉट्सअॅप युजर्स हा स्टिकर पॅक डाऊनलोड करू शकतात. यामध्ये 'Money Heist'मधील पात्र आणि इव्हेंट्सचा समावेश आहे. स्टिकर्स पॅक मध्ये तुम्हांला Tokyo, Lisbon, Moscow, Berlin, Nairobi, Rio, Denver, Stockholm, Bogotá, Palermo, आणि Professor यांचे चेहरे, एक्सप्रेशन पहायला मिळणार आहेत. हा अॅनिमेटेड स्टिकर्स पॅक Mucho Pixels ने डिझाईन केला आहे. 17 स्टिकर्सच्या पॅकसाठी तुम्हांला केवळ 658KB जागा लागणार आहे.
'Money Heist' stickers on WhatsApp कसा डाऊनलोड कराल?
- व्हॉट्सअॅप ओपन करा.
- स्टिकर आयकॉन वर क्लिक करा.
- व्हॉट्सअॅपच्या स्टिकर स्टोअर वर Heist animated stickers चा पर्याय निवडा.
- आता तो डाऊनलोड करा.
- स्टिकर पॅक डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही चॅटच्या वेळेस आवडतं Money Heist sticker निवडू शकता.
व्हॉट्सअॅप कडून सध्या मेसेज रिअॅक्शन फीचर देखील तपासलं जात आहे. यामध्ये मेसेजला इमोजीसने उत्तर देता येईल. व्हॉट्सअॅप कडून सातत्याने युजर्सचा मेसेजिंग अनुभव मजेशीर ठेवण्यासाठी स्टिकर्स पॅक अपडेट केले जातात. काही दिवसांपूर्वी रक्षाबंधन निमित्त देखील खास पॅक लॉन्च करण्यात आला होता.