Mobile Screen Time Limit for Kids: मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी चीनकडून उपाययोजना

जगभरामध्ये त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, चीन सरकारने याबाबत महत्त्वाची पावले टाकण्यासाठी सुरुवात केली आहे.

Kids Screen Time. (Photo Credits: Pixabay)

Smartphone Addiction in Children: लहान मुलांमध्ये मोबाईल, ऑनलाईन गेम आणि इतर काही गोष्टींच्या माध्यमातून वाढत असलेला स्क्रीन टाईम जगभरात चिंतेचा विषय आहे. जगभरामध्ये त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, चीन सरकारने याबाबत महत्त्वाची पावले टाकण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यासाठी चीनच्या इंटरनेट निगराणी विभागाने मुलांच्या स्मार्टफोनवर घालवल्या जाणाऱ्या वेळावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी चीनच्या सायबरस्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने बुधवारी त्यांच्या साइटवर मसुदा मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की अल्पवयीन मुलांना रात्री 10 वाजल्यापासून मोबाइल डिव्हाइसवर बहुतेक इंटरनेट सेवा वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत 16 ते 18 वयोगटातील मुले दिवसातून फक्त दोन तास इंटरनेट वापरु शकतील.

सायबरस्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना (CAC) ने म्हटले आहे की स्मार्ट डिव्हाइसेसच्या निर्मात्यांनी मायनर मोड प्रोग्राम्स सादर करावेत. जे 18 वर्षाखालील वापरकर्त्यांना रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मोबाइल डिव्हाइसवर इंटरनेटवर प्रवेश करण्यास प्रतिबंधित करतील. प्रदात्यांना प्रस्तावित सुधारणांच्या अंतर्गत कालमर्यादा देखील सेट करावी लागेल, असे CAC ने म्हटले आहे. 16 ते 18 वयोगटातील वापरकर्त्यांना दिवसातून दोन तास, आठ ते 16 वयोगटातील मुलांना एक तास आणि आठ वर्षांखालील मुलांना फक्त आठ मिनिटांची परवानगी असेल. (हेही वाचा, Gaming App Fraud: गेमिंग अ‍ॅप फ्रॉड पासून सावध राहण्याचा सल्ला; फसवणूक झाल्यास इथे मागा मदत)

CAC ने मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केल्यानंतर हाँगकाँगमधील दुपारच्या व्यापारात चिनी टेक कंपन्यांचे शेअर्स घसरले. प्रामुख्याने बिलिबिली आणि कुएशौ कंपन्यांचे समभाग अनुक्रमे 6.98 टक्के आणि 3.53 टक्के घसरले तर टेन्सेंट होल्डिंग्ज, जे सोशल नेटवर्क अॅप WeChat चालवतात त्यांचे समभाग 2.99 टक्के नी उतरले. अलिकडच्या काही वर्षांत अधिकारी तरुण लोकांमध्ये मायोपिया आणि इंटरनेट व्यसनाच्या दरांबद्दल अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.