..तर गुगल Laptop किंवा Computer मध्ये वापरता येणार नाही, ऑपरेटींग सिस्टीम विडोजचा ‘हा’ Version बंद होणार
विंडोज७ आणि विंडोज ८ ही दोन व्हर्जन आता तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमध्ये वापरता येणार नाही. तरी विंडोजकडून या संबंधीत सविस्तर सुचना देण्यात आल्या असुन आता विंडोज७ किंवा विंडोज ८ ऐवजी तुम्ही विंडोजचं कुठल व्हर्जन वापरायचं या बाबत माहिती देण्यात आली आहे.
मोबाईल, मोबाईल अपलिकेश किंवा सिस्टीममध्ये विंडोज अपडेट्स येताना तुम्ही अनेकदा बघितलं असेल पण आता अचानक तुम्हाला असं कळल तर की तुम्ही तुमच्या फोनमध्ये वापरत असलेली ऑपरेटींग सिस्टीम विंडोज बंद होणार आहे. तर दोन मिनिट तुम्हाला धक्काच बसेल कारण ऑपरेटींग सिस्टीमचं बंद झाली तर तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर इतर कुठलही काम करता येणार नाही, सॉफ्टवेअर वापरता येणार नाही किंवा क्षणाक्षणाला ज्या गुगलची तुम्ही जगातील कुठल्याही कामासाठी मदत घेत असता ते गुगल देखील तुम्हाला तुमच्या सिस्टममध्ये वापरता येणार नाही. ऑपरेटींग सिस्टीम शिवाय सगळ काही बंदचं ना. पण गुगल ही संपूर्ण ऑपरेटींग सिस्टीम नाही तर विंडोज७ आणि विंडोज ८ ही दोन व्हर्जन आता तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमध्ये वापरता येणार नाही. तरी विंडोजकडून या संबंधीत सविस्तर सुचना देण्यात आल्या असुन आता विंडोज७ किंवा विंडोज ८ ऐवजी तुम्ही विंडोजचं कुठल व्हर्जन वापरायचं या बाबत माहिती देण्यात आली आहे.
१० जानेवारी म्हणजेचं उद्यापासून तुम्हाला विंडोज ७ आणि विंडोज ८.१ हे व्हर्जन तुम्हाला तुमच्या सिस्टीमध्ये वापरता येणार नाही. या ऐवजी आता तुम्ही विंडोज१० किंवा विंडोज ११ यापैकी कुठलही व्हर्जन तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमध्ये वापरु शकता. किंबहूना तरी तुमच्या लॅपटॉमध्ये अजूनही विंडोज ७ किंवा विंडोज ८.१ असल्यास तुम्हाला गुगल देखील वापरता येणार नाही. विंडोज ७ किंवा विंडोज ८.१ च्या वापरकर्त्यांनी लवकरात लवकर अपग्रेड करण्याच्या सुचना दिल्या आहेत. (हे ही वाचा:- WhatsApp Update: व्हॉट्सअॅप कडून वापरकर्त्यांना भन्नाट गिफ्ट! आता विना इंटरनेट करा व्हॉट्स अॅप चॅट, वापरकर्त्यांसाठी नवा फिचर लॉंच)
दरम्यान विंडोज ऑपरेटींग सिस्टीम वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तरी आता विंडोजचं नवं व्हर्जन अपग्रेड करतांना विंडोज १० पेक्षा अधिक विंडोज ११ इंस्टाल करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. किंबहूना विविध लॅपटॉप किंवा कंम्पुटर युजर विंडोज ११ ला अधिक पसंती दाखवत आहेत. Windows 11 ने पीसीच्या वापरकर्त्यांसाठी विविध अपडेट्स आणले असुन नवनवीन फिचर लॉंच केली आहेत. नवीन वापरकर्ता इंटरफेस व्यतिरिक्त, Windows 11 Microsoft Store द्वारे थेट संगणकावर विविध Android अॅप्स देखील चालवू शकतात. पण जुने पीसीमध्ये विंडोज 11 इंस्टाल होणार नाही. कारण त्यांना ऑपरेट करण्यासाठी इंटेल 8व्या जनरल चिप्सपेक्षा नवीन टीपीएम मॉड्यूल आणि सीपीयू आवश्यक आहेत. तर जुन्या कंम्युटर वापरधारकांना आता केवळ विंडोज १० हाचं पर्याय उपलब्ध आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)