Mi 11 Lite स्मार्टफोन लवकरचं भारतात लाँच होणार; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि खास फिचर्स
Mi 11 Lite स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच करण्यात येणार असून त्याची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांदरम्यान असेल.
शाओमीचा प्रमुख स्मार्टफोन Mi 11 Lite लॉन्चिंगविषयीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. नुकताच हा फोन FCC वेबसाइटवर आढळून आला. आता हा स्मार्टफोन BIS (Bureau of Indian Standards) सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. तो लवकरचं भारतीय बाजारामध्ये लाँच होणार आहे. तथापि, कंपनीकडून Mi 11 Lite चे प्रक्षेपण, किंमत आणि वैशिष्ट्यांबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. टेक टिपस्टर मुकुल शर्मा यांनी ट्विट केलं की, Mi 11 Lite स्मार्टफोन M2101K9AI मॉडल नंबरसह BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर सूचीबद्ध आहे. हा स्मार्टफोन लवकरचं भारतीय बाजारात लाँच होईल. परंतु, या स्मार्टफोनच्या फिचर्ससंदर्भात कोणतीही माहिती उघडकीस आलेली नाही. लीक झालेल्या अहवालानुसार, एम आय 11 लाइट स्मार्टफोन MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. या स्मार्टफोनमध्ये 4,150mAh बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी किंवा 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. यासह भविष्यातील हँडसेटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वापरकर्त्यांना ब्लूटूथ 5.1 आणि ड्युअल बँड वाय-फाय सारखी वैशिष्ट्ये मिळतील. (Apple चा स्वस्त iPad लवकरचं भारतात लाँच होणार; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)
Mi 11 Lite अपेक्षित किंमत -
आतापर्यंत उघड झालेल्या वृत्तानुसार, Mi 11 Lite स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच करण्यात येणार असून त्याची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांदरम्यान असेल.
Mi 11 Lite -
शाओमीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात Mi 10T Lite स्मार्टफोन बाजारात आणला होता. भारतात या स्मार्टफोनची सुरूवातीची किंमत 35,999 रुपये आहे. Mi 10T Lite स्मार्टफोन ड्युअल सिम (नॅनो) कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आला आहे. Mi 10T Lite अँड्रॉइड 10 बेस्ड एमआययूआय 12 वर कार्य करेल. फोनला 6.67 इंचाचा डिस्प्ले मिळेल. फोनच्या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1,080x2,400 पिक्सल असेल. याशिवाय यात गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी एसओसी वापर करण्यात आलेला आहे.
Mi 10T Lite स्मार्टफोन क्वाड कॅमेरा सेटअपसह येईल. त्याची प्राथमिक लेन्स 64 एमपी असतील. याशिवाय यात 8 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 एमपी मॅक्रो कॅमेरा, 2 एमपी खोलीचे सेन्सर उपलब्ध असतील. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 एमपी कॅमेरा आहे. Mi 10T Lite मध्ये 128 जीबी स्टोरेज आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5 जी, 4 जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये पॉवरबॅकसाठी 4,820mAh बॅटरी आहे.