Realme आणि Xiaomi ला टक्कर देण्यासाठी आला Made In India चा अॅन्ड्रॉइड स्मार्ट टीव्ही, 18 मार्चला होणार लॉन्च

याची थेट टक्कर Realme आणि Xiaomi सोबत होणार आहे. ही एक लेटेस्ट अॅन्ड्रॉइड स्मार्ट टीव्हीची सीरिज असणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

itel चा नवा मेड इन इंडिया अॅन्ड्रॉइड स्मार्ट टीव्ही भारतात 18 मार्चला लॉन्च होणार आहे. याची थेट टक्कर Realme आणि Xiaomi सोबत होणार आहे. ही एक लेटेस्ट अॅन्ड्रॉइड स्मार्ट टीव्हीची सीरिज असणार आहे. सोशल मीडियात झळकवण्यात आलेल्या टीझरनुसार, itel ब्रँन्ड दोन स्क्रिन साइज 32 इंच आणि 43 इंचाचा येणार आहे. या व्यतिरिक्त कंपनी 55 इंच स्क्रिन साइज मध्ये स्मार्ट टीव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. इंटेलचा 32 इंच आणि 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही फ्रेमसेल प्रीमिय ID डिझाइनमध्ये येणार आहे.यामध्ये पॉवरफुल स्टिरियोचे सपोर्ट मिळणार आहे.(Micromax In 1: कमी किंमतीत मिळणार धमाकेदार फिचर्स! लवकरच मायक्रोमॅक्स कंपनीचा बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारात होणार दाखल)

स्मार्ट टीव्ही खरेदी केल्यास ग्राहकांना पॅनलवर 2 वर्षांची वॉरंटी दिली जाणार आहे. या अॅन्ड्रॉइड स्मार्ट टीव्हीमध्ये इन-बिल्ट Chromecast चा सपोर्ट दिला जाऊ शकतो. हा स्मार्ट टीव्ही 20 हजार रुपयांचा प्राइस प्वॉइंटवर उतरवला जाऊ शकतो. परंतु कंपनीने याच्या किंमती बद्दल खुलासा करण्यात आलेला नाही. स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल वॉइस सपोर्ट सुद्धा मिळू शकतो. नव्या itel स्मार्ट टीव्ही सीरिजमध्ये अल्ट्रा-ब्राइट लाइट सपोर्ट मिळणार आहे. साउंट क्वॉलिटीसाठी Dolby ऑडिओ सपोर्ट केला गेला आहे. स्मार्ट टीव्ही मध्ये पॉप्युलर ओटीटी अॅप सपोर्ट मिळणार आहे.(Samsung Galaxy M सीरिज मधील पहिला 5G स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या खासियत)

itel कडून यापूर्वी I आणि A  सीरिजचा स्मार्ट टीव्ही लॉन्च करण्यात आला आहे. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, कंपनीची रणनीति कमी किंमतीत शानदार स्मार्ट टीव्ही लॉन्च करण्याची असून TCL, Realme आणि Xiaomi ला जोरदार टक्कर देण्याची आहे. itel स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोन मार्केटमध्ये लीडरशिप पोझिशनमध्ये आहे. CMR च्या रिपोर्ट्सनुसार, itel 7,000 च्या सेगमेंट मधील सर्वाधिक विश्वासू ब्रँन्ड आहे.