ऐकावे ते नवलंच! बाजारात आला LED Face Mask, मोबाईलसारखा करू शकाल वापर; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये (Video)
कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे प्रत्येक नागरिकाने फेस मास्क (Face Mask) लावणे बंधनकारक झाले आहे. परंतु सतत चेहऱ्यावर हे मास्क लावणे अनेकांना त्रासदायक वाटत आहे. अशा परिस्थितीत, मास्कला एक मनोरंजक स्वरूप आणि फील देण्याच्या उद्देशाने नवीन कूल एलईडी फेस मास्क (LED Face Mask) सादर केला गेला आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे प्रत्येक नागरिकाने फेस मास्क (Face Mask) लावणे बंधनकारक झाले आहे. परंतु सतत चेहऱ्यावर हे मास्क लावणे अनेकांना त्रासदायक वाटत आहे. अशा परिस्थितीत, मास्कला एक मनोरंजक स्वरूप आणि फील देण्याच्या उद्देशाने नवीन कूल एलईडी फेस मास्क (LED Face Mask) सादर केला गेला आहे. हे मास्क लुमेन कॉचरच्या (Lumen Couture) फॅशन डिझायनर चेल्सी क्लुकास (Chelsea Klukas) यांनी डिझाइन केला आहे. द वर्जच्या (The Verge) वृत्तानुसार, हे एलईडी मास्क ड्युअल लेयर कॉटनपासून बनविलेले आहेत, ज्यात चार्जेबल LED फ्लेक्स पॅनेल आहे.
हे पॅनेलला स्वच्छ करून काढले जाऊ शकते. हा मास्क बॅटरी आणि चार्जेबल वायरसह येतो. या मास्कची किंमत सुमारे 7,000 रुपये आहे व हे मास्क तुम्ही लुमेन कॉचरच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. सध्या कोरोना विषाणूमुळे मास्कची मागणी प्रचंड वाढली आहे. विविध आकार, स्टाईल आणि कपड्यांच्या प्रकारामधील मास्क बाजारात आले आहेत. आता हे एलईडी फेस मास्क लोकांना आकर्षित करत आहेत.
पहा व्हिडिओ -
फॅशन डिझाइन चेल्सी क्लुकास नुसार कोविड-19 साथीच्या काळात अशा मास्कद्वारे कोणताही नफा मिळविणे हे त्यांचे उद्दीष्ट नव्हते. Lumen Couture च्या म्हणण्यानुसार, जून महिन्यात मास्कद्वारे कमावलेली सुमारे 3,72,962 रक्कम ती जागतिक आरोग्य संघटनेला, कोविड-19 च्या निधीसाठी देणार आहे. (हेही वाचा: Lyfas Mobile App स्मार्टफोन मधुन बॉडी सिग्नल तपासून कोरोना व्हायरस रुग्णांना ओळखण्यात करणार मदत, नेमका काय आहे हा ऍप?)
एलईडी डिस्प्लेसह हे विशेष मास्क पातळ एलईडी मॅट्रिक्स स्क्रीनसह येतात, जे वापरकर्त्यास त्याच्या स्वत: च्या मोबाइल अॅपनुसार कस्टमाइज्ड करता येतील. अॅपच्या मदतीने रेखाचित्र, मजकूर आणि व्हॉइस ला मास्कमध्ये जोडले जाऊ शकते. फॅब्रिकपासून बनवलेल्या या मास्कमध्ये श्वास घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तसेच, त्याच्या खाली एक साइड स्क्रीन आहे. मास्कच्या एलईडी पॅनेलवर एक मायक्रोफोन इनपुट प्रदान केला जातो. ज्यामुळे युजर मास्क वर सामाजिक डिस्टेंसिंग मेसेज, जसे की ‘स्टँड बॅक’ किंवा ‘6 फूट अंतर’ सारखे सामाजिक अंतर संदेश शेअर करू शकतात. तोंड आणि नाक मास्कद्वारे झाकल्यामुळे बोलणे सोपे नाही, या प्रकरणात, एलईडी मास्कच्या मदतीने लोकांपासून आंतर ठेवण्याची समस्या सोडविली जाऊ शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)