Kalpana Chawla Named Spacecraft: कल्पना चावला पुन्हा अवकाशात जाणार, Northrop Grumman च्या नव्या अंंतराळयानाचे नाव भारतीय अंंतराळवीराला समर्पित

अंतराळात जाणारी पहिली महिला म्हणुन ओळखल्या जाणार्‍या कलप्ना चावला यांंना हा सन्मान मिळणे ही भारतासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे.

Kalpana Chawla (Photo Credits: Getty Images)

नॉर्थ्रॉप ग्रुमन (Northrop Grumman) यांनी आपल्या पुढील अवकाशयानाचे नाव बदलून भारतीय दिवंंगत अंतराळवीर डॉ कल्पना चावला (Kalpana Chawala)  यांच्या नावे ठेवले आहे. अंतराळात जाणारी पहिली महिला म्हणुन ओळखल्या जाणार्‍या कलप्ना चावला यांंना हा सन्मान मिळणे ही भारतासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे. एस.एस. कंपनीच्या अधिकार्‍यांंनी मंगळवारी हा निर्णय जाहीर करत International Space Station वर जाण्यासाठी प्रक्षेपण केल्या जाणार्‍या नॉर्थ्रॉप ग्रुमनच्या पुढील सिग्नस अंतराळयानाचे नाव कल्पना चावला यांंच्या नावे ठेवले जाईल असे सांंगितले आहे.

अंतराळ क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या व्यक्तीच्या नावावरुन प्रत्येक सिग्नसचे नाव ठेवणे ही कंपनीची परंपरा आहे. इतिहासात स्थान मिळविणारी भारतीय वंशाची पहिली महिला म्हणून यावेळी भारतीय वंंशाच्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांंचे नाव यावेळेस यानाला दिले जाणार आहे असे कंंपनीतर्फे सांंगण्यात आले आहे.

दरम्यान, S.S. Kalpana Chawala हे सिगन्स अंतराळयान हे Virginia Space’s Mid-Atlantic Regional Spaceport (MARS) येथुन सप्टेंबर 29 रोजी अवकाशात पाठवण्यात येणार आहे यामध्ये 3,629 किलो सामान असणार आहे.एस.एस. कल्पना चावला अंतराळयान कमी गुरुत्वाकर्षणात मोठ्या प्रमाणात लागणार्‍या आगीचा अभ्यास करणार आहे.ज्यानंंतर ते पुन्हा पृथ्वीवर पॅसिफिक महासागरात लॅंंड होईल.

कल्पना चावला यांंनी दोन वेळा अवकाशात प्रवेश केला होता,सुरुवातीला 1994 मध्ये अमेरिकेची चौथी अमेरिकन मायक्रोगॅरविटी पेलोड फ्लाइट STS-87 मधुन त्यांंनी 19 नोव्हेंबर रोजी उड्डाण केले होते 5 डिसेंबर 1997 रोजी हे यान पृथ्वीवर परतले होते, ज्यानंंतर पुन्हा 16 जानेवारी 2003 रोजी कोलंबियामध्ये 16 दिवसांसाठी STS-107 क्रू सह कल्पना अवकाशात गेल्या, या 16 दिवसात या टीम ने 80 हून अधिक प्रयोग केले होते. पृथ्वीवर परत येत असताना अंंतराळयानाने पेट घेतल्याने चावला आणि तिचे सहा एसटीएस -107 क्रू मेट्सचा टेक्सासमध्ये 1 फेब्रुवारी 2003 रोजी मृत्यु झाला.