Jio वापरकर्ते आता घर बसल्या आपले Postpaid सिम करू शकतात Prepaid; जाणून घ्या सोपी पद्धत

कोरोना व्हायरस काळात आपण कोठेही बाहेर जाणे योग्य ठरणार नाही. म्हणूनचं आम्ही तुम्हाला घरातूनचं जिओ पोस्टपेडमधून जिओ प्रीपेडमध्ये कसे स्विच करावे याबाबत सांगणार आहोत.

Jio वापरकर्ते आता घर बसल्या आपले Postpaid सिम करू शकतात Prepaid; जाणून घ्या सोपी पद्धत
Reliance Jio (Photo Credits: Twitter)

रिलायन्स जिओ (Reliance Jio) प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही कनेक्शन सुविधा देते. जिओच्या प्रीपेड योजना पोस्टपेडपेक्षा किंचित स्वस्त आहेत. जिओच्या सर्वात स्वस्त मासिक पोस्टपेड प्लानची किंमत 199 रुपये आहे. प्रीपेडमध्ये तर आपले यापेक्षा कमी खर्चात काम होते. तसेच काही वापरकर्ते बिल देयकाची त्रास टाळण्यासाठी प्रीपेडला प्राधान्य देतात. आज आम्ही तुम्हाला जिओ पोस्टपेड वरून जिओ प्रीपेडमध्ये सीन कसे शिफ्ट करावे याबद्दल सांगणार आहोत.

तुम्ही हे काम ऑनलाईन तसेच जिओ स्टोअरला भेट देऊनही करू शकता. कोरोना व्हायरस काळात आपण कोठेही बाहेर जाणे योग्य ठरणार नाही. म्हणूनचं आम्ही तुम्हाला घरातूनचं जिओ पोस्टपेडमधून जिओ प्रीपेडमध्ये कसे स्विच करावे याबाबत सांगणार आहोत. कंपनी ही सुविधा केवळ आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदान करते. जिओ पोस्टपेडमधून जिओ प्रीपेडमध्ये सीम रुपांतर कसे करावे त्यासंदर्भातील स्टेप्स जाणून घेऊयात. (वाचा - Jio कंपनीचा धमाकेदार प्रीपेड प्लॅन, युजर्सला मिळणार प्रतिदिन 2GB डेटासह फ्री कॉलिंग)

  • जिओच्या अधिकृत वेबसाइटवर (www.jio.com) जा आणि सिम होम डिलिव्हरी पर्यायावर क्लिक करा.
  • आता आपल्याला आपले नाव आणि थेट पोस्टपेड क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
  • दोन्ही तपशील प्रविष्ट केल्यानंतर जनरेट ओटीपी पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या पोस्टपेड क्रमांकावर ओटीपी येईल. तो प्रविष्ट करा आणि सत्यापित करा.
  • I am interested in Prepaid हा पर्याय निवडा आणि Port to Jio पर्यायावर क्लिक करा.
  • सिम कार्डच्या वितरणासाठी आपला संपूर्ण पत्ता भरा.
  • पत्ता दिल्यानंतर Submit Port to Jio request विनंतीवर क्लिक करा.
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिओ एक्झिक्युटिव्ह तीन ते चार दिवसांनी आपल्या घरी येतील.

आधार कार्ड तसेच इतर काही कागदपत्रे पाहिल्यानंतर तुम्हाला प्रीपेड सिम देण्यात येईल.

अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या जिओ पोस्टपेडमधून जिओ प्रीपेडमध्ये आपले सिम पोस्ट करू शकता. यासाठी तुम्हाला वरील टीप्स नक्की उपयोगात येतील.

(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2021 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).