Jio युजर्ससाठी खुशखबर! मिळणार 30 मिनिटे फ्री टॉक टाइम
जिओने आपल्या युजर्सला खुश ठेवण्यासाठी हे पाउल उचलले आहे.
रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने त्यांच्या युजर्सला 30 मिनिटापर्यंत फ्री टॉक टाइम (Free Talk Time) देण्याचा निर्णय दिला आहे. जिओने आपल्या युजर्सला खुश ठेवण्यासाठी हे पाउल उचलले आहे. यामुळे युजर्सच्या संख्येत कमतरता होऊ नये म्हणून याचा विचार केला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच जिओने दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कसोबक संपर्क करायचा असल्यास कॉलसाठी प्रति मिनिट 60 पैसे चार्ज लावण्यात येणार असल्याचे म्हटले होते.
जिओ लिमिटेड पिरियड ऑफरची घोषणा पूर्वीच्या निर्णयाच्या 48 तासाच्या आतमध्ये घेतला आहे. जिओ ग्राहकांना याबाबत मेसेजच्या माध्यमातून सुचना देण्यात आली आहे. परंतु हा वन टाइम ऑफर प्लॅन 30 मिनिटांच्या सुविधेनंतर पहिल्या 7 दिवसात उपलब्ध होणार आहे. रिलायन्स जिओने 9 ऑक्टोंबरला तत्काळ प्रभावामुळे अतिरिक्त चार्ज वसूल केला जाण्याची घोषणा केली होती. यावर जिओने इकॉनॉमिक्स टाइम्स यांना सुद्धा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. मात्र जिओच्या या निर्णयामुळे अन्य मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी युजर्सला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.(Jio युजर्सला झटका, आता दुसऱ्या नेटवर्कवर फोन करण्यासाठी युजर्सला मोजावे लागणार पैसे)
जिओच्या निर्णयामुळे ट्वीटरसह अन्य सोशल मीडिया साइटवर युजर्सकडून संपात व्यक्त करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीने जिओची ऑफर सुरु केली होती. तेव्हा लाइफटाइम फ्री कॉलिंग सुविधा मिळणार असल्याचे वचन दिले होते. मात्र जिओच्या बदलत्या प्रकारामुळे काहींनी जिओ क्रमांक पोर्ट करण्याचा विचार केला आहे. तसेच सोशल मीडियावरील युजर्सनी या गोष्टीची खिल्ली ही उडवली होती. त्यामध्ये दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 10,20,50 आणि 100 रुपयांचे वाउचर खरेदी करण्यास सांगण्यात आले होते.