Jio Giga Fiber: तुमच्या स्मार्टफोनवर येणाऱ्या 'या' Email पासून सावध रहा नाहीतर बँक खात्यामधील पैसे होतील चोरी
त्यामुळे सर्वजण याबाबत उत्सुक आहेत. मात्र या संबंधित एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.
जिओ गिगाफायबर (Jio Giga Fiber) आणि जिओ डीटीएच (Jio DTH) सेवा लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वजण याबाबत उत्सुक आहेत. मात्र या संबंधित एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. ट्वीटरच्या एका अधिकृत अकाउंच्या माध्यमातून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. या ट्वीट मध्ये असे लिहिण्यात आले आहे की, काही लोकांना एक इमेल येत असून त्यामध्ये बँक खात्यासंबंधित माहिती देण्यात यावी असे सुचित करण्यात आले आहे.
सायबर पीस कॉर्प्स नावाच्या एका ग्रुपने या इमेल स्कॅमबाबत लोकांना सुचना दिली आहे. या ग्रुपने असे म्हटले आहे की, जिओ गीगाफायबर आणि जिओ डीटीएचचे नाव वापरुन ही फसवणुक केली जात आहे.
Spam वेबासाइट पासून सावध रहा
ट्वीटरवर एक फोटो पोस्ट करण्यात आला असून त्यामध्ये जिओ गीगाफायबर एक्टिव्हेट करण्यासाठी एक मेसेज पाठवला जात आहे. तसेच क्लिक नावाचे ऑप्शन देण्यात आले असून त्यावर क्लिक केल्यास युजर्सला स्पॅम साइटवर नेले जाते. तेथे गेल्यावर युजर्सला बँक खाते संबंधित माहिती देण्याचे सांगितले जाते. त्यामुळे युजर्सनी अशा खोट्या वेबसाइटपासून सावध रहा असे आवाहन करण्यात आले आहे. तर जिओ कडून बँक खात्यासंबंधित कोणतीही माहिती मागितली जात नाही हे सुद्धा सांगण्यात आले आहे.
परंतु युजर्सला गीगाफायबरसाठी रजिस्ट्रेशन करायचे असल्यास त्यांनी प्रथम https://gigafiber.jio.com/registration या संकेतस्थळावरुन ते करावे. तसेच सुरुवातीलाच युजर्सला त्याचा पत्ता विचारला जातो. त्यामुळे फक्त पत्ता देऊन ज्या ठिकाणी गीगाफायबरचे कनेक्शन हवे आहे तेथे ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.