Jio Fiber Free Trial Plan: जिओ फायबर अनलिमिटेड फ्री ट्रायल प्लान घोषीत; वैधता, दर आणि स्पीड घ्या जाणून

सामान्यत: अपडोल स्पीड डाऊनलोड स्पीड बरीच कमी असते. मात्र, जिओ फायबरच्या नव्या प्लानमध्ये जे स्पीड दिले जाणार आहे. ते डाऊनलोड आणि अपलोड या दोन्ही साठी समान असमार आहे.

'नए इंडिया का नया जोश' (NAYE INDIA KA NAYA JOSH) नावाने रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने एक नवा जिओ फायबर प्लान (Jio Fiber Plan) बाजारात आणला आहे. या प्लान अंतर्गत जो नावा ग्राहक जोडला जामार आहे त्याला अनलिमिटेड डेटा (Jio Fiber Unlimited Data) सोबत 30 दिवासांची सेवा मोफत दिली जाणार आहे. यात 150 एमबीपीएस स्पीड मिळणार आहे. फ्री ट्रायलसाठी (Jio Fiber Free Trial Plan) ग्राहकाला 4के सेट टॉप बॉक्स आणि 10 ओटीटी अॅप्स साठी फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा मिळणार आहे.

एक महिना फ्री ट्रायलनंतर ग्राहक कोणताही एक प्लान निवडू शकतो. 'नए इंडिया का नया जोश' प्लान्स 399 रुपये प्रति महिना दराने सुरुवात होऊन 1499 रुपये प्रति महिनापर्यंत राहणार आहेत. फ्री ट्रायल नंतर ग्राह जिओ फायबर कनेक्शन बंदही करु शकतात. कनेक्शन बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणी होणार नाही. तसेच ग्राहकाला कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत. अथवा अटही घातली जाणार नाही.

प्रतिमहिना 399 रुपये या प्लानमध्ये 30 एमबीपीएस स्पीड मिळेल. मार्केटमध्ये हा प्लान सर्वात स्वस्त प्लानपैकी एक मानला जात आहे. या प्लानमध्ये कोणत्याही पद्धतीचे अॅप्स सब्सक्रिप्शन मिळणार नाही. 399 रुपयाच्या प्रमाणे 699 रुपयांच्या प्लानमध्येही ओटीटी अॅप मिळणार नाही. मात्र, याचे स्पीड वाढवून 100 एमबीपीएस होऊ शकेल. वर्क फ्रॉम होमसाठी 699 रुपयांचा प्लानही मिळू शकणार आहे. (हेही वाचा, Tata Sky ब्रॉडबॅन्डने लॉन्च केला 300Mbps स्पीड आणि 500GB डेटा असणारा धमाकेदार प्लॅन, जाणून घ्या अधिक)

प्रतिमहिना 999 रुपये आणि 1499 रुपयांच्या प्लानमध्ये ओटीटी अॅप्सचा भडीमार आहे. 999 रुपयांमध्ये 150 एमबीपीएस स्पीड सोबत 1000 रुपयांच्या किमततीचे 11 ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळेल. तर 1499 रुपयांच्या प्लान मध्ये 1500 रुपये किमतीचे 12 ओटीटी अॅप्स मिळतील. टीव्ही अथवा नेटवर उपलब्ध कार्यक्रम, चित्रपट आणि गेम शौकीनांसाठी हे प्लान खास करुन तयार करण्यात आले आहेत.

'नए इंडिया का नया जोश' प्लानचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, यात अपलोड आणि डाऊनलोड स्पीड समान असणार आहे. सामान्यत: अपडोल स्पीड डाऊनलोड स्पीड बरीच कमी असते. मात्र, जिओ फायबरच्या नव्या प्लानमध्ये जे स्पीड दिले जाणार आहे. ते डाऊनलोड आणि अपलोड या दोन्ही साठी समान असमार आहे.