Jio 399 Plan: जिओच्या प्लॅनमध्ये मिळणार 75GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह मोफत Netflix, Prime Video आणि Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन
जर तुम्ही सिंगल रिचार्ज प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा बेनिफिट्ससह Netflix, Prime Video आणि Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन सारखा प्लॅन घेण्याचा विचार करत असाल तर जिओ कंपनीचा एक धमाकेदार प्लॅन तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
जर तुम्ही सिंगल रिचार्ज प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा बेनिफिट्ससह Netflix, Prime Video आणि Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन सारखा प्लॅन घेण्याचा विचार करत असाल तर जिओ कंपनीचा एक धमाकेदार प्लॅन तुमच्यासाठी उपलब्ध आहे. जिओ कंपनीचे काही प्री-पेड आणि पोस्ट पे रिचार्ज प्लॅन सुद्धा आहेत जे तुम्हाला मोफत ओटटी सर्विस देतात. या रिचार्ज प्लॅननंतर तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिज्नि+हॉटस्टारचे स्वतंत्रपणे रिचार्ज करावे लागणार नाही आहे. यामुळे तुम्ही महिन्याभरात 1 हजार रुपयांपर्यंत बचत करु शकता. तर जाणून घ्या जिओच्या अशा काही प्लॅनबद्दल अधिक.
जिओ कंपनीच्या 399 रुपयांच्या पोस्टपेट प्लॅनमध्ये काही ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सब्सक्रिप्शन युजर्सला दिले जाणार आहे. या प्लॅन 75GB डेटा आणि अधिकाधिक 200GB डेटा रोलओवर सुविधेसह येणार आहे. जर तुम्ही 75GB डेटाची लिमिट पूर्ण करत असाल तर तुम्हाला 10 रुपये प्रति GB डेटानुसार पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच अनलिमिटेड वॉयस आणि 100SMS प्रतिदिन सुविधा मिळते. या व्यतिरिक्त प्लॅनमध्ये Amazon Prime Video चे एका वर्षासाठी मोफत सब्सक्रिप्शन ऑफर ही मिळणार आहे.(Micromax in 2b: मायक्रोमॅक्सचा इन 2 बी मोबाईल आज होणार लाँच, पहा फिचर्स आणि किंमत)
कंपनीच्या 5999 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 100GB डेटा दिला जात आहे. त्याचसोबत 200GB डेटा रोलओवरची सुविधा मिळते. डेटा लिमिट संपल्यानंतर 10 रुपये प्रति GB च्या नुसार चार्ज भरावा लागणार आहे. यामध्ये कोणत्याही एका फॅमिली मेंबर्सला जोडावे लागणार आहे. तसेच काही ओटीटी सर्विस सुद्धा मोफत मिळणार आहे. जर तुम्ही प्रीपेड युजर्स असाल तर जिओ 401 रुपये, 598 रुपये, 777 रुपये आणि 2599 रुपये मोफत मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.