Instagram वर Clubhouse सारखे फिचर, लाईव्ह दरम्यान व्हिडिओ-ऑडिओ करता येणार बंद

हे फिचर Clubhouse सारखे असून त्यामध्ये युजर्सला लाईव्ह व्हिडिओ दरम्यान आपला ऑडिओ किंवा व्हिडिओ बंद करता येणार आहे.

Instagram (Photo Credits-File Image)

इन्स्टाग्रामवर (Instagram) एक नवे फिचर रोलआउट करण्यात आले आहे. हे फिचर Clubhouse सारखे असून त्यामध्ये युजर्सला लाईव्ह व्हिडिओ दरम्यान आपला ऑडिओ किंवा व्हिडिओ बंद करता येणार आहे. या फिचरच्या मदतीने Instagram Live वर आता फक्त ऑडिओ शेअर करता येणार आहे. तर फेबसबूक कडून काही नव्या प्रोडक्ट्सवर ही काम केले जात आहे. यामध्ये वर्च्युअल रुम्स आणि साउंडबाइट्स सारख्या फिचरचा समावेश आहे. साउंडबाइट्स फिचरमध्ये युजर्सला शॉर्ट ऑडिओ आपल्या फिडवर पोस्ट करता येणार आहे. इंन्स्टाग्राम लाईव्हसाठी हे नवे फिचर ग्लोबली लॉन्च केले आहे.(Redmi Raining 9s on Flipkart: रेडमीच्या 9 सीरिजच्या 'या' स्मार्टफोन्सची 2 ते 7 मे दरम्यान फ्लिपकार्टवर होणार बरसात, वाचा सविस्तर)

कंपनीचे हे नवे फिचर Android आणि iOS युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले आहे. TechCrunch च्या एका रिपोर्ट्सनुसार, या फिचरमुळे युजर्सवरील एक ताण कमी होणार आहे. याचा वापर युजर फक्त बोलण्यासाठी करु शकतात. त्यांना दिसणे महत्वाचे नसून त्यामधून ते ऑडिओ चॅट रुम प्रमाणे दिसणार आहे. Instagram Live दरम्यान ऑडिओ म्यूट करण्याच्या फिचर्सच्या माध्यमातून तुम्हाला दुसऱ्या युजर्सचा आवाज स्पष्ट ऐकता येणार आहे. या फिचरमुळे त्यांना कोणतीच समस्या येणार नसून ते त्यांना आपली बाजू मांडता येणार आहे.(Instagram Reels व्हिडिओ मोबाईलमध्ये कसे Save कराल? जाणून घ्या सोप्पी ट्रिक)

युजर्सला ऑडिओ आणि व्हिडिओ म्यूट करण्यासाठी त्यांच्या स्क्रिनच्या खाली एक ऑप्शन दिला जाईल. युजर्स मायक्रोफोनच्या आयकॉनवर क्लिक करुन ऑडिओ म्यूट करु शकतात. तर व्हिडिओ कॅमेऱ्याच्या बटणावर क्लिक करुन व्हिडिओ ऑफ करता येईल. एकदा व्हिडिओ ऑफ झाल्यानंतर व्हिडिओ बॉक्समध्ये युजर्सचा प्रोफाइल फोटो फक्त दिसणार आहे. होस्ट एखाद्या खास युजर्सचा ऑडिओ किंवा व्हिडिओ ऑफ करु शकत नाही. इंन्स्टाग्रामचे हे नवे फिचर अॅड करण्यासाठी काम करण्यात येत आहे. लाईव्ह व्हिडिओ वेळी चार जणांना अॅड करता येणार आहे. हे फिचर सर्वात प्रथम डिसेंबर मध्ये लॉन्च करण्यात आले होते. गेल्या वर्षी Live Rooms च्या नावाने ग्लोबली लॉन्च केले होते.