Instagram युजर्ससाठी TikTok सारखे फिचर्स रोलआऊट
इन्स्टाग्रामवर सुद्धा युजर्सला बदलत्या ट्रेन्ड नुसार फिचर्स उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात येतो
फेसबुक कंपनीच्या मालकीचे असलेल्या इन्स्टाग्रामचे युजर्स दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. इन्स्टाग्रामवर सुद्धा युजर्सला बदलत्या ट्रेन्ड नुसार फिचर्स उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात येतो. त्यात आता एक नव फिचर रोलआऊट केले असून इन्स्टाग्रामच्या Boomerang स्टोरीज मध्ये TikTok सारखे फिचर्स देण्यात आले आहे. यामध्ये SloMo, Echo आणि Duo असे फिचर्स देण्यात आले आहेत. एवढेच नाही या फिचर्सचा वापर करुन युजर्सला व्हिडिओ ट्रीम ही करता येणार आहे. कंपनीने त्यांच्या एका विधानात असे म्हटले आहे की, इन्स्टाग्रामच्या कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही स्वत: एका अनोख्या पद्धतीने इतरांच्या समोर व्यक्त होऊ शकता.
इन्स्टाग्रामवरील हे नवे फिल्टर ऑप्शन युजर्सला Boomerang कम्पोजरच्या Instagram Stories कॅमेऱ्याच्या येथे दिसून येणार आहेत. SloMo फिचरच्या मदतीने बुमरँग व्हिडिओ त्यांच्या मूळ स्पीडपेक्षा निम्म्या स्पीडने कनवर्ट करता येणार आहेत. Echo फिचरच्या मदतीने डबल विजन इफेक्ट मिळणार असून जे बुमरँग आणि ड्युओ या दोन्हीचा वापर करता येणार आहे. त्याचसोबत OTA अपडेटच्या मदतीने युजर्सला बुमरँग व्हिडिओ ट्रिम करण्यासोबत स्पीड आणि कालावधी कमी शकता येणार आहे.(WhatsApp वरील मेसेज चुकून डिलिट झालाय? 'या' पद्धतीने पुन्हा मिळवता येणार)
हे नवे फिचर्स तुमच्या इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी कॅमेऱ्याच्या ऑप्शनमध्ये जाऊन Boomerang व्हिडिओ काढावा लागणार आहे. त्यानंतर स्टोरी कॅमेरा सुरु करुन बुमरँग स्वाइप करावे. शटर बटन टॅप केल्यानंतर होल्ड करुन इनफिनिटी निशाणवर टॅप करावे लागणार आहे. असे केल्यानंतर तुम्हाला टिकटॉक वरील फिचर्सचा वापर करता येणार आहे.