भारतीयांनो तयार रहा; 'या' दिवशी लाँच होणार देशातील पहिला 5G Smartphone Realme X50 Pro; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

भारतात कमी वेळात आपले पाय रोवणारी कंपनी, रियलमी (Realme) लवकरच आपला पहिला 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात आणत आहे.

Realme X50 Pro 5G Smartphone Teaser Confirms 90Hz Super AMOLED Display (Photo Credits: Sina Weibo)

गेले अनेक महिने सर्वत्र 5 जी फोनची (5 G Phone) चर्चा सुरु आहे. भारतातही हा फोन वापरण्यास अनेक वापरकर्ते उत्सुक आहेत, अशा लोकांसाठी एक खुशखबर आहे. आता लवकरच भारतीयांच्या हातात 5 जी फोन दिसणार आहे. भारतात कमी वेळात आपले पाय रोवणारी कंपनी, रियलमी (Realme) लवकरच आपला पहिला 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात आणत आहे. रियलमी 24 फेब्रुवारी रोजी Realme X50 Pro स्मार्टफोन भारतात सादर करेल, जो भारताचा पहिला 5G फोन असेल.

Realme X50 Pro मोबाइल वर्ल्ड कॉन्ग्रेस येथे लाँच होणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे मोबाइल वर्ल्ड कॉन्ग्रेस रद्द झाली. यानंतर, रियलमी कंपनी Realme X50 Pro लाँच करण्यासाठी एक वेगळा कार्यक्रम आयोजित करीत आहे.

हा फोन नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात लाँच केला जाईल. कार्यक्रमास संबंधित मीडिया आमंत्रणेही कंपनीने पाठविली आहेत.

हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या फ्लॅगशिप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 865 सोबत येईल. याशिवाय फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि यूएफएस 3.0 स्टोरेज 256 जीबी पर्यंत देण्यात येईल. हे डिव्हाइस अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. हा फोन 65 डब्ल्यू सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह येईल.

यावर्षी जानेवारीमध्ये रियलमीने चीनमध्ये दीर्घ काळापासून चर्चेत असलेला, आपला पहिला 5G फोन एक्स 50 5 जी (Realme X50 5G) बाजारात आणला. रियलमी एक्स 50 5 जी मध्ये लोकांना उत्तम प्रोसेसर आणि कॅमेरा मिलेळ. याशिवाय हा फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. रिपोर्टनुसार फोनमध्ये 6 कॅमेरे असू शकतात. यात 64 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल. फोनच्या टीझर इमेजमध्ये असेही दिसून आले आहे की, यात ड्युअल सेल्फी कॅमेरा असेल. रिअॅलिटी एक्स 2 प्रोमध्ये 20 एक्स हायब्रीड झूम देखील दिसू शकेल. (हेही वाचा: Vivo चा iQoo 3 भारतात 25 फेब्रुवारीला होणार लॉन्च, कंपनीकडून खुलासा)

Realme X50 5G किंमत -

कंपनीने चीनच्या स्मार्टफोन बाजारात या फोनचे तीन रॅम व्हेरिएंट आणले आहेत. यामध्ये 6 जीबी रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेज, 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.रियलमीने पहिल्या व्हेरिएंटची किंमत सुमारे 28,000 रुपये, दुसर्‍या व्हेरिएंटची किंमत 25,800 रुपये,  आणि तिसऱ्या प्रकारासाठी 31,000 किंमत ठेवली आहे.