5G Handset Market in 2024: अमेरिकेला मागे टाकत भारत ठरला जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G हँडसेट बाजारपेठ

भारताने अमेरिकेला मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाची 5G हँडसेट बाजारपेठ होण्याचा मान मिळवला आहे. सन 2024 च्या पहिल्या सहामाहीत, परवडणाऱ्या 5G उपकरणांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे जागतिक 5G हँडसेट शिपमेंटमध्ये दरवर्षी 20% वाढ झाली, असल्याची माहिती काउंटरपॉईंट रिसर्च नुकत्याच प्रसारीत झालेल्या अहवालामध्ये पुढे आली.

5G Services | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारताने अमेरिकेला मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाची 5G हँडसेट बाजारपेठ होण्याचा मान मिळवला आहे. सन 2024 च्या पहिल्या सहामाहीत (5G Handset Market in 2024), परवडणाऱ्या 5G उपकरणांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे जागतिक 5G हँडसेट शिपमेंटमध्ये दरवर्षी 20% वाढ झाली, असल्याची माहिती काउंटरपॉईंट रिसर्च नुकत्याच प्रसारीत झालेल्या अहवालामध्ये पुढे आली. जागतिक बाजारपेठेत अग्रगण्य असलेल्या, 'Apple' ने सर्व 5G हँडसेट शिपमेंटपैकी 25% पेक्षा जास्त वाटा उचलला. खास करुन त्याच्या 'iPhone 15' आणि 'iPhone 14' मालिकेच्या जोरदार विक्रीत विशेष वाढ दिसून आली. न्यूज एजन्सी IANS ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, 2024 च्या पहिल्या सहामाहीत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 5G मॉडेल्सच्या यादीत 'Apple'ने अव्वल स्थान मिळवत प्रिमियम सेगमेंटमध्ये विक्रम नोंदवला.

5G हँडसेट विक्रीत भारताची वाढ

काउंटरपॉइंट रिसर्चचे वरिष्ठ विश्लेषक प्रचीर सिंग यांनी माहिती देताना सांगितले की, जागतिक 5G हँडसेट मार्केटमध्ये भारताला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवून देण्यामध्ये Apple सोबतच ' Xiaomi, Vivo, Samsung' आणि इतर यांसारख्या ब्रँड्सकडून बजेट 5G स्मार्टफोन शिपमेंटच्या मोठ्या प्रमाणात आहे. “पहिल्या सहामाहीत अमेरिकेला मागे टाकत भारत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G हँडसेट बाजारपेठ बनला. त्याचे कारम Xiaomi, Vivo, Samsung आणि बजेट सेगमेंटमधील इतर ब्रँड्सकडून झालेली मोठ्या प्रमाणावरील शिपमेंट हे आहे. (हेही वाचा, Apple to Create Jobs in India: ॲपल भारतात निर्माण करणार 6 लाखांहून अधिक नोकऱ्या; 70 टक्क्यांहून अधिक असतील महिला कर्मचारी)

'सॅमसंग', ज्याने 21% पेक्षा जास्त मार्केट शेअरसह जागतिक स्तरावर दुसरे स्थान मिळवले. त्यांच्या 'Galaxy A ' आणि 'S24 ' मॉडेल्सना जोरदार मागणी दिसून आली. ऍपल आणि सॅमसंग या दोघांनी 2024 च्या पहिल्या सहामाहीत 5G हँडसेटसाठी टॉप-10 यादीत प्रत्येकी पाच स्थानांवर कब्जा केला.

इमर्जिंग मार्केट्समुळे 5G वाढीला चालना

इतर उदयोन्मुख बाजारपेठांनी 5G हँडसेट विक्रीतही वाढ अनुभवली आहे. कारण ग्राहक या उपकरणांना कमी किंमतीच्या श्रेणींमध्येही एक महत्त्वपूर्ण अपग्रेड म्हणून पाहिले जाते. 'बजेट 5G हँडसेट'ची वाढलेली मागणी वाढीला चालना देण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. विशेषत: आशिया-पॅसिफिक यांसारख्या प्रदेशात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now