भारतात You Tube नव्या टप्प्यावर, अमेरिकेलाही टाकले मागे

याचे प्रमुख कारण म्हणजे भारतात स्वस्त असलेला मोबाईल डेटा. भारतात संगीत, आरोग्य, शिक्षण आणि विविध विषयांवरील स्थानिक भाषांमध्ये आशय निर्मिती करण्यासाठी You Tube चा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे.

YouTube CEO Susan Wojcicki | (Only representative image)

अत्यंत कमी दरात उपलब्ध असलेला मोबाईल डेटा आणि स्मार्टफोन आदींमुळे You Tube जोरदार कमाई करत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार You Tube ने भारतात सर्वात मोठी बाजारपेठ व्यापली आहे. You Tube डिजिटल व्यापार प्रणालीत आता अमेरिकाही मागे पडली आहे. You Tube ही अमेरिकेची सर्वात मोठी टेक कंपनी Google चा घटक आहे. भारतात You Tube चे सुमारे 26.5 कोटी इतके सब्सक्रयबर आहेत.

You Tube अधिकाऱ्याने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार 95 टक्के व्हिडिओची विक्री टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील स्थानिक भाषांमध्ये होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतात स्वस्त असलेला मोबाईल डेटा. भारतात संगीत, आरोग्य, शिक्षण आणि विविध विषयांवरील स्थानिक भाषांमध्ये आशय निर्मिती करण्यासाठी You Tube चा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. (हेही वाचा, All about TikTok: तुम्हीपण 'टिक टॉक' Video बनवता? मग आगोदर वयाचा अंदाज घ्या)

जगभरातील देशांच्या तुलनेत भारतात मोबाईल डेटा अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध आहे. डिसेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओच्या लॉन्चिंगनंतर मोबाईल डेटा हा अधिकाधिक स्वस्तच होत चालला आहे. You Tubeचे सीईओ सुजैन वोजस्की यांनी सांगितले की, गेल्या एका वर्षात You Tub चा वापर आणि व्हिडिओंची विक्री 85 टक्क्यांनी वाढली आहे. यातील 60 टक्के  You Tube वापर आणि व्हिडिओ निर्मिती ही भारतातील प्रमुख 6 मेट्रो शहरांबाहेरुन होत आहे. सध्यास्थितीत प्रति एक जीबी डेटा किंमत 10 रुपयांपेक्षाही कमी आहे. काही वर्षांपूर्वी हिच किंमत प्रति जीबी तब्बल 100 रुपये किंवा त्याहीपेक्षा अधिक होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif