IPL Auction 2025 Live

भारताने 2017 मध्ये इज्राइल डिफेंसच्या करारात खरेदी केले होते Pegasus स्पायवेअर-रिपोर्ट

अमेरिकेतील वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

Hacking | Representational Image (Photo Credits: IANS)

जगभरातील जवळजवळ 50000 लोकांच्या कथित बेकायदेशीर हेरगिरी प्रकरणी समोर आलेल्या पेगासेस सॉफ्टवेअरला भारताने इज्राइल कडून 2017 मध्ये खरेदी केले होते. अमेरिकेतील वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की, पेगासस (Pegasus) हेरगिरी सॉफ्टवेअर भारत आणि इज्राइलच्या दरम्यान 2017 मध्ये झालेल्या जवळजवळ 2 बिलियन अमेरिकन डॉलरची प्रगत शस्त्रे आणि गुप्तचर उपकरणांच्या करारामध्ये केंद्रात होता. रिपोर्टमध्ये जुलै 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इज्राइलच्या यात्रेच्या सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रवासानंतर इज्राइलचा दौरा करणारे पहिलेच ते भारतीय पंतप्रधान होते.

गेल्या वर्षात जगभरातील नेते मंडळी, कलाकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि राष्ट्राध्यक्षांची कथित हेरगिरी प्रकरणी इज्राइली सॉफ्टवेअरचे नाव समोर आले होते. प्रोजेक्ट पेगासस नावाच्या एका रिपोर्टमध्ये असे सांगितले होते की, पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतात जवळजवळ 174 पत्रकार आणि नेतेमंडळी पेगाससच्या निशाण्यावर होते. यामध्ये एम के वेणु, सुशांत सिंह सह पत्रकार ते काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या नावाचा समावेश होता. यामुळे खासगी मुद्द्यांबद्दल चिंता निर्माण झाली होती. पेगासस स्पायवेअरला इज्राइली कंपनी NSO ग्रुप तयार करते.

‘The Battle for the World's Most Powerful Cyberweapon अशा शीर्षकासह NYT ने आपल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले की, इज्राइली कंपनी NSO ग्रुप जवळजवळ एका दशकापासून आपल्या स्पायवेअर सॉफ्टवेअरला जगभरता कायद्याचे प्रवर्तन आणि गुप्त एजेंसीच्या सदस्याच्या आधारावर विक्री करत होता. या फर्मने दावा केला आहे की, हा स्पायवेअर जे करु शकतो ते अन्य कोणाही करु शकत नाही. एका खासगी कंपनी किंवा कोणत्याही देशातील गुप्त एजेंसी. याच्या माध्यमातून कोणताही आयफोन किंवा अॅन्ड्रॉइ़ड स्मार्टफोन एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन सातत्याने आणि विश्वनिय पद्धतीने हॅक करु शकता येतो.(Google Invest in Bharti Airtel: गुगल करणार एअरटेलमध्ये 100 कोटी डॉलरची गुंतवणूक, स्वस्त स्मार्टफोन करणार तयार)

रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, दशकांपर्यंत भारताने फलिस्तानी मुद्द्यांसाठी प्रतिबद्धता नीती कायम टिकून रहावी आणि इज्राइल सोबत भारत दूर राहिल. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी संबंधात जवळीकता आली आणि एक स्थानिक बीचवर मोदी आणि तेथील तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन नेत्याहू हे अनवाणी पायाने तेथे चालतानाचे फोटो सुद्धा समोर आले होते.

रिपोर्टमध्ये असे ही म्हटले की, दोन्ही देशांनी नात्यातील हे संबंध 2 बिलियन डॉलरच्या सेल पॅकेजवर सहमती झाल्याच्या कारणास्तव होती. जी केंद्रात पेगासस आणि एक मिसाइल सिस्टिम होती. त्यानंतर काही महिन्यांनी नेतन्याहू यांनी भारतातील दुर्मिळ ठिकाणी दौरा केला. त्यानंतर जून 2019 मध्ये भारताने संयुक्त राष्ट्राच्या इकॉनॉमिक अॅन्ड सोशल काउंसिलमध्ये फलिस्तीनच्या मानवाधिकार संगठनेला निरीक्षक दर्जा देण्याच्या विरोधात मतदान केले.

पीटीआयकडून न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टसनुसार सरकारच प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. द वायरच्या रिपोर्टमध्ये त्यांनी जगभरातील 16 मीडिया कंपन्यांसोबत मिळून NSO ग्रुपच्या पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून निशाण्यावर असलेल्या लोकांची नावे समोर आणण्याचे काम केले होते. फ्रान्समधील फारबिडन स्टोरीज यांनी NSO ग्रुपच्या हेरगिरी सॉफ्टवेअरचा लीक झालेला डेटा एक्सेस केला होता. ज्यामध्ये जगभरातील 50 हजार लोकांची लीस्ट होती. जे पेगाससच्या निशाण्यावर असल्याचा संशय होता. गेल्या वर्षात ऑक्टोंबरमध्ये भारतात पेगाससचा कथित दुरुपयोगाच्या तपासाठी सुप्रीम कोर्टाने 3 स्वतंत्र सदस्यांचे एक विशेष पॅनल सुद्धा तयार केले होते.