Reliance Jio 5G Launch 2021: मुकेश अंबानी यांची घोषणा,पुढच्या वर्षी रिलायन्स जिओ 5G सेवा लॉन्च करणार
ते म्हणाले की, या अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्रात देश केवळ आयातीवर अवलंबून राहू शकत नाही. वाचकांच्या माहितीसाठी असे की, अंबानी यांचा जिओच्या माध्यमातून सुरु केलेला व्यवसाय अवघ्या चार वर्षांमध्ये देशात अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे.
पुढच्या वर्षीच्या मध्यावर म्हणजे 2021 च्या दुसऱ्या सहामाईमध्ये रिलायन्स जिओ भारतात Jio 5G सेवा सुरु करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industry) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मंगळवारी (8 डिसेंबर) इंडिया मोबाइल कांग्रेस 2020 मध्ये ही घोषणा केली. उद्योगपती अंबानी यांनी म्हटले आहे की, Jio द्वारा लॉन्च करण्यात येणारी 5G सेवा सरकारच्या आत्मनिर्भर भारत नीतिचा एक साक्षीदार ठरेन. देशात 5G सुरु होण्यासोबतच Jio Googleसोबत एक माफक दरातील एंड्रॉइड फोन विकसीत करत आहेत. हे दोन्ही उपक्रम नजीकच्या काळात लॉन्च होणार आहेत.
मुकेश अंबानी यांनी इंडिया मोबाइल काँग्रेस-2020 मध्ये बोलताना सांगितले की, 5G सेवा अत्यंत वेगाने सुरु करण्यासाठी गतीमान पावले टाकणे आवश्यक आहे. आम्ही गतीमान पावलांसोबतच स्वस्त दरात 5G सेवा उपलब्ध करु शकू. (हेही वाचा, 5G Connection in India: 2021 पर्यंत भारताला मिळू शकेल पहिले 5 जी नेटवर्क; 2026 पर्यंत असतील 35 कोटी युजर्स- Report)
अंबानी यांनी सेवा हार्डवेयर विनिर्माण केंद्राच्या रुपात विकसीत करण्याबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, या अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्रात देश केवळ आयातीवर अवलंबून राहू शकत नाही. वाचकांच्या माहितीसाठी असे की, अंबानी यांचा जिओच्या माध्यमातून सुरु केलेला व्यवसाय अवघ्या चार वर्षांमध्ये देशात अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. जिओ द्वारा वॉयस कॉलींग सेवा मोफत दिली जात आहे. त्याशिवाय रिलायन्स जिओचे इंटरनेट डेटा पॅक दरही अगदीच अत्यल्प आहेत. 5G हे पाचव्या पिढीचे मोबाईल नेटवर्क आहे. जे व्हर्च्युअल पद्धीतने सर्व गोष्टी आणि उपकरणांना जोडता येणार आहे.
पुढे बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन म्हणाले की, आज जगभरात भारत सर्वात चांगल्या पद्धीतीने डिजिटल युगात प्रवेश करतो आहे. त्यामुळे देशात 5जी नेटवर्क सेवा तातडीने आणणे आवश्यक आहे. रिलायन्स जिओ देशात 5जी क्रांतीची सुरुवात करेन असेही मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.