IPL Auction 2025 Live

एकाच स्मार्टफोनमध्ये दोन क्रमांकावरुन WhatsApp कसे वापराल? जाणून घ्या

त्यामुळे दिवसेंदिवस व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची संख्या वाढत चालली आहे. व्हॉट्सअ‍ॅप मध्ये चॅटिंगशिवाय अन्य असे काही फिचर्स असे आहेत ज्याच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप वापरणे अधिक मजेशीर वाटते.

(WhatsApp: Photo Credits: Pixabay)

सोशल मीडियातील जगप्रसिद्ध असलेले व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या युजर्ससाठी बदलत्या ट्रेन्ड नुसार नवे अपडेट घेऊन येतात. त्यामुळे दिवसेंदिवस व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची संख्या वाढत चालली आहे. व्हॉट्सअ‍ॅप मध्ये चॅटिंगशिवाय अन्य असे काही फिचर्स असे आहेत ज्याच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप वापरणे अधिक मजेशीर वाटते. आजकाल व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफसाठी अधिक प्रमाणात केला जातो. त्यासाठी युजर्स विविध क्रमांकाचा वापर करतात. तर दोन व्हॉट्सअ‍ॅप असल्याने दोन मोबाईल फोन घेऊन फिरावे लागते. मात्र जर तुम्हाला एकाच स्मार्टफोनमध्ये दोन क्रमाकांवरुन व्हॉट्सअ‍ॅप कसे सुरु ठेवायचे असा प्रश्न पडला असेल तर आम्ही तुम्हाला याबाबत ट्रिक सांगणार आहोत.

सध्याचे बहुतांश स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम कार्डसोबत येतात. यामुळे युजर्सला एकाच स्मार्टफोनचा वापर करुन दोन क्रमांक सुरु ठेवू शकतात. मात्र एकाच स्मार्टफोनमध्ये जरी दोन सिम कार्ड असल्यास त्यात दोन व्हॉट्सअ‍ॅप सुरु ठेवता येत नाहीत. पण हुवावे आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन हे ड्युअल अ‍ॅप किंवा ड्युअल मोड फिचर सोबत येतात. तर जाणून घ्या एकाच स्मार्टफोनमध्ये दोन क्रमांकावरुन WhatsApp कसे वापरु शकता.(Whatsapp Dark mode Feature: Android, iOS युजर्ससाठी व्हॉट्सऍपचे नवे डार्क मोड फिचर लॉन्च; जाणून घ्या अपडेट करण्याची पद्धत)

>>शाओमी- MIUI ओएसवर चालणाऱ्या शाओमी स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये गेल्यास तेथए तुम्हाला ड्युअल अ‍ॅपचे ऑप्शन दाखवले जाईल.

>>सॅमसंग- या स्मार्टफोनमध्ये हे फिचर ड्युअल मेसेंजरच्या नावाचे तुम्हाल दिसेल. तेथे गेल्यानंतर अ‍ॅडवान्स फिचरचे ऑप्शन दाखवले जाईल.

>>ओप्पो- ओप्पो युजर्सला हे फिचर क्लोन अ‍ॅपचा नावाने दाखवले जाईल. हे फिचर तुम्हाला सेटिंग्समध्ये दिसेल.

>>वीवो- वीवो युजर्सला हे फिचर क्लोन अ‍ॅपचा नावाने दाखवले जाईल. हे फिचर तुम्हाला सेटिंग्समध्ये दिसेल.

या फिचरचा उपयोग करण्यासाठी प्रथम युजर्सला त्यांच्या स्मार्टफोनमध्ये ड्युअल अ‍ॅप सेटिंग्समध्ये जावे. त्यानंतर ज्या अ‍ॅपचे ड्युप्लिकेशन करायचे आहे ते सिलेक्ट करावे. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचे ड्युप्लिकेशन करायचे असेल तर व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक करावे. असे केल्यानंतर होम स्क्रिनवर जाऊन अ‍ॅप लॉन्चर येथे दाखवण्यात येणाऱअया दुसऱ्या व्हॉट्सअ‍ॅप लोगोवर टॅप करा. आता हे व्हॉट्सअ‍ॅप दुसऱ्या क्रमांकासोबत कॉन्फिगर करुन तुमच्या मोबाईल मधील क्रमांकासोबत तुम्ही त्यांच्यासोबत चॅटिंग करणे सुरु करु शकता.