Snapchat Baby Filter कसे वापराल?

या फोटोत सर्वजण अगदी निरागस दिसत आहे. पण हे फोटोज नेमके बनवले कसे?

Snapchat Baby Filter (Photo Credits: Twitter)

येत्या काही दिवसांत तुम्ही सोशल मीडियावर नेते मंडळी, सेलिब्रेटी यांचे खास लहान मुलांच्या चेहऱ्यातील फोटोज पाहिले असतील. या फोटोत सर्वजण अगदी निरागस दिसत आहेत. पण हे फोटोज नेमके बनवले कसे? आणि तुम्हालाही हे फोटोज बनवता येतील का? तर जाणून घेऊया याविषयी...

तर ही सर्व कमाल स्नॅपचॅट अॅपच्या अपडेटेड व्हर्जनची आहे. स्नॅपचॅट अॅपने आपल्या अपडेटेड व्हर्जनमध्ये बेबी फिल्टरचा (Baby Filter) पर्याय दिला आहे. या फिचरच्या माध्यमातून तुमचा चेहरा डिटेक्ट होवून मग फोटो क्लिक होतो आणि मग चेहरा लहान मुलाप्रमाणे बदलतो.

अॅपचे बेबी फ्लिटर वापरण्याच्या 4 सोप्या स्टेप्स:

# स्नॅपचॅट अॅप इन्स्टॉल करा आणि ईमेल च्या मदतीने त्यावर लॉगईन करा.

# त्यानंतर रिअर किंवा फ्रंट कॅमेरा सिलेक्ट करा.

# स्माईली आयकॉनवर क्लिक करुन बेबी फिल्टर सिलेक्ट करा.

# त्यावर क्लिक करा. तुमचा फोटो बेबी फोटो मध्ये कन्वर्ट होईल.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही फोटोज:

या सर्व प्रक्रियेसाठी केवळ 2-3 सेकंद लागतात. विशेष म्हणजे फक्त फोटो काढतानाच नव्हे तर काढलेला फोटो देखील तुम्ही या फिचरद्वारे लहान मुलासारखा करु शकता. अॅनरॉईड युजर्स स्नॅपचॅट गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस युजर्स अॅपल स्टोअरवरुन फ्री मध्ये इन्स्टॉल करु शकता. याची साईज सुमारे 55MB आहे. हे अॅप आतापर्यंत सुमारे 50 कोटीहून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे.