WhatsApp Messages किबोर्डचा वापर न करता कसे पाठवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

या अॅपद्वारे तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अगदी सहज मेसेज पाठवू शकता. व्हॉईस, व्हिडिओ कॉलचा आनंद घेऊ शकता.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅपची (WhatsApp) लोकप्रियता विविध कारणांमुळे आहे. या अॅपद्वारे तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अगदी सहज मेसेज पाठवू शकता. व्हॉईस (Voice), व्हिडिओ कॉलचा (Video Call) आनंद घेऊ शकता. तसंच हे अॅप अॅड-फ्री (Add-Free) असल्याने सर्वांनाच भावते. विशेष करुन चॅटिंगसाठी वापरले जाणारे या अॅपद्वारे तुम्ही किबोर्ड (Keyboard) न वापरताही मेसेज पाठवू शकता. हे खरे आहे. तुम्ही टाईपिंगसाठी कोणतेही कष्ट न करता व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज पाठवू शकता. (WhatsApp च्या माध्यमातून 'या' पद्धतीने डाउनलोड करा तुमचे लसीकरणाचे सर्टिफिकेट)

तुमच्या मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टमनुसार गुगल असिस्टंट किंवा सिरीचा वापर तुम्ही यासाठी करु शकता. जर तुम्ही दुसरे कोणते काम करत असाल तर व्हॉईस असिस्टंटचा वापर करुन तुम्ही आपल्या मित्रांना मेसेज पाठवू शकता. त्यासाठी जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

स्टेप 1- जर तुम्ही आतापर्यंत गुगल असिस्टंट वापरल नसेल तर  ‘Hey Google’ किंवा ‘Okay Google’ बोलून अॅप मोबाईलमध्ये ओपन करा.

स्टेप 2- तुम्ही ‘Hey Google' बोलू शकता किंवा होम बटण थोडा वेळ प्रेस करुन व्हॉईस असिस्टंट अॅक्टीव्हेट करु शकता.

स्टेप 3- व्हर्च्युअल असिस्टंट करुन रिपॉन्स आल्यास ‘Send a WhatsApp Message’ असे बोला. त्यानंतर कोणाला मेसेज पाठवायचा आहे हे तुम्हाला विचारण्यात येईल.

स्टेप 4- त्यानंतर ज्याला मेसेज पाठवयचा आहे त्याचे नाव घ्या. त्यानंतर काय मेसेज पाठवायचा आहे, हे तुम्हाला विचारण्यात येईल.

स्टेप 5- त्यानंतर व्हॉईस असिस्टंट मेसेज टाईप करायला सुरुवात करेल. मेसेज टाईप झाल्यानंतर ‘Okay, send it’ असे बोला. मेसेज पाठवला जाईल. दुसऱ्यांदा मेसेज पाठवताना ‘Okay, send it’ कमांड दिल्याशिवाय मेसेज पाठवला जाईल. म्हणजेच तुम्हाला ‘Okay, send it’ बोलण्याची गरज नाही.

अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून चॅटचा आनंद घेऊ शकता.