WhatsApp वर Voice Call रेकॉर्ड करण्यासाठी 'या' सोप्प्या स्टेप्स फॉलो करा

WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

सध्या व्हॉट्सअॅपचा वापर केवळ मेसेज पाठवण्यासाठीच नाही तर व्हॉइस कॉलिंगसाठीही केला जातो. मात्र, या प्लॅटफॉर्मवर व्हॉईस कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा उपलब्ध नाही. पण आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या एका खास ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपचा व्हॉइस कॉल सहज रेकॉर्ड करू शकता.(Flipkart कडून नागरिकांसाठी खास सुविधा ! Flight Booking वर 2500 रुपयांची मिळणार सूट)

व्हॉट्सअॅपने 2015 मध्ये आपल्या युजर्ससाठी व्हॉईस कॉलिंग फीचर लॉन्च  केले होते. कंपनीने म्हटले आहे की, व्हॉईस कॉलिंग फीचरद्वारे यूजर्स नेहमी त्यांच्या मित्र आणि कुटुंबीयांशी जोडले जातील. त्यांना ही सुविधा खूप उपयोगी पडणार आहे. तर जाणून घ्या कशा पद्धतीने व्हॉट्सअॅपवर वॉइस कॉल रेकॉर्ड करता येणार आहे.(Mobile Services in Uncovered Villages: महाराष्ट्रासह 5 राज्यातील दुर्गम गावांत उपलब्ध होणार मोबाईल सेवा; USOF योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी)

>>WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्यासाठी, Google Play Store वर जा आणि क्यूब कॉल रेकॉर्डर अॅप डाउनलोड करा

>>आता अॅप उघडा आणि व्हॉट्सअॅपवर जा आणि ज्या यूजरचा कॉल तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे त्याला कॉल करा

>>तुम्ही कॉल करताच, हे अॅप तुमचा कॉल बॅकग्राउंडमध्ये रेकॉर्ड करण्यास सुरुवात करेल.

>>तुम्ही कॉल कट केल्यावर रेकॉर्डिंग देखील आपोआप थांबेल

>>तुम्हाला अॅपच्या नोटिफिकेशन पॅनलमध्ये रेकॉर्ड केलेला कॉल दिसेल

WhatsApp ने अलीकडेच आपल्या वेब युजर्ससाठी कस्टम स्टिकर फीचर लाँच केले आहे. या फीचरद्वारे यूजर्स त्यांच्या फोटोचे स्टिकर बनवू शकतात. तसेच तुम्ही इतर  युजर्ससोबत शेअर करू शकता. सध्या, हे साधन Android आणि iOS युजर्ससाठी उपलब्ध नाही. हे फिचर लवकरच स्टेबल युजर्ससाठी रोलआउट करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.