स्मार्टफोनची स्क्रीन लॉक करुन युट्युबवर गाणी ऐकायची आहेत ? ही आहे सोपी ट्रिक !

कारण यावर कोणतेही गाणे ऐकायचे असल्यास व्हिडिओ पाहावा लागतो.

युट्युब म्युझिक (Photo credits: Pixabay)

जगभरात व्हिडिओ स्ट्रिमिंग वेबसाईट Youtube अतिशय लोकप्रिय आहे. त्याचबरोबर ती आपली गरजही झाली आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. Youtube वर तुम्ही फक्त व्हिडिओ बघू शकत नाही तर त्यावर व्हिडिओज अपलोड करुन त्यातून कमाईही करु शकता. ही सगळी वैशिष्ट्ये असली तरी Youtube वर ऑडिओ म्युझिक ऐकणे कठीण होते. कारण यावर कोणतेही गाणे ऐकायचे असल्यास व्हिडिओ पाहावा लागतो.

म्हणूनच Youtube ने 2015 मध्ये Youtube Red लॉन्च केले होते. ज्याला आता YouTube Premium म्हटले जाते. YouTube Premium वर तुम्ही व्हिडिओ स्मार्टफोनच्या बॅकग्राऊंडला चालवू शकता. पण यातही दोन समस्या आहेत. एक म्हणजे यासाठी तुम्हाला विशिष्ट किंमत मोजावी लागेल. तर दुसरी म्हणजे ही सुविधा भारतात उपलब्ध नाही.

अशातच काही ट्रिक्स तुमच्या कामी येऊ शकतात. या ट्रिक्सच्या मदतीने स्मार्टफोनवर तुम्ही YouTube वरील गाणी ऐकू शकता. व्हिडिओ न पाहता आणि स्क्रीन लॉक करुन. व्हिडिओ फोनच्या बॅकग्राऊंडला सुरु राहील.

स्टेप 1 : Google Play Store वरुन Mozilla Firefox हे अॅप डाऊनलोड करा.

स्टेप 2 : Mozilla Firefox अॅप इंस्टॉल केल्यावर त्यात YouTube चालवा. पण लक्षात असू द्या की, YouTube ब्रॉऊजरवर चालवा. YouTube अॅपवर नाही.

स्टेप 3 : तुमच्या आवडीचा कोणताही व्हिडिओ YouTube वर चालवा.

स्टेप 4 : व्हिडिओ सुरु झाल्यानंतर फोनचे बॅक बटण किंवा मग फोनची स्क्रीन ऑफ करा. व्हिडिओ फोनच्या बॅकग्राऊंडला सुरु राहील आणि स्क्रीन बंद करुनही तुम्ही गाण्याचा आनंद घेऊ शकाल. पण ही ट्रिक तुम्ही फक्त अॅनरॉईड फोन्सवर वापरु शकता. आयफोनवर ही ट्रिक काम करणार नाही.

नोट- मात्र या ट्रिकचा अतिवापर टाळा. यामुळे फोनची बॅटरी म्युझिक अॅपच्या तुलनेत अधिक लवकर संपते.