WhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल; पहा त्यासाठी Messenger Room कशी कराल?
जर तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुम्हांला त्याच्या माध्यमातूनही व्हीडिओ कॉल करता येणार आहे.
व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. फेसबूकच्या मालकीच्या असणर्या या अॅपच्या माध्यमातून केवळ संवाद नाही तर आता व्यवहार करणं देखील सुकर झालं आहे. दरम्यान या अॅपमध्ये त्यांच्या युजर्सना नेहमीच नवनव्या गोष्टींचा अनुभव घेता यावा म्हणून अपडेट्स दिले जातात. आता काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपकडून दिलेल्या नव्या अपडेटनुसार, युजर्सना WhatsApp Web च्या माध्यमातूनही आता करता येणार व्हिडिओ कॉल करता येणार आहे. म्हणजे आता जर तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुम्हांला त्याच्या माध्यमातूनही व्हीडिओ कॉल करता येणार आहे.
नव्या फीचरमुळे आता मेसेंजर रूम बनवता येणार आहे. काही दिवसांपूर्वी फेसबूकनेही त्यासाठी टेस्टिंग़ सुरू असल्याची माहिती दिली होती. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यासाठी तुमच्या WhatsApp Web version 2.2031.4 असणं गरजेचे आहे.
WhatsApp Web वर व्हिडिओ कॉल कसा करायचा?
व्हॉट्सअॅप वेब वर व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल करण्यासाठी तुमच्याकडे 2 प्रकारे Messenger Room बनवता येऊ शकते. पहा त्याची काय काय संपूर्ण प्रक्रिया-
- स्क्रिन वर डाव्या बाजूला मेन्यूचा ऑप्शन दिसेल ( 3 डॉट्स) त्यावर क्लिक करा.
- त्यामध्ये 'Create a Room' निवडा
- यावरून तुम्हांला Facebook Messenger Rooms वर नेलं जाईल.
- 'Continue with Messenger' वर क्लिक करा.
- त्यानंतर नवं पेज ओपन होईल, त्यावर 'Continue with Facebook account' चा पर्याय निवडा. आणि मग 'Continue' करा. तुमचा फोन कनेक्ट केला जाईल.
हा कॉल तुम्ही एका व्यक्ती किंवा ग्रुप मध्ये करू शकता.
दरम्यान व्हॉट्सअॅपने वेब चॅट मध्येच एक 'रूम' फिचर उपलब्ध करून दिले आहे. attachment option मध्येच हा पर्याय तुम्हांला दिसेल. कॉलमध्ये कनेक्ट होण्यासाठी तुम्हांला लिंक उपलब्ध करून द्यावी लागते. त्यानंतरच कॉलमध्ये समाविष्ट होता येते. एकावेळी 50 जण एका कॉलमध्ये सहभाग घेऊ शकतात.