Microsoft Word सोबतच ऑफिस अ‍ॅप्समधील डॉक्युमेंट्स तुम्ही पासवर्ड सेट करून सुरक्षित कशी ठेवाल?

तुम्हांलाही तुमची काही माहिती मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट मध्ये सुरक्षितपणे साठवायची, शेअर करायची असेल तर जाणून घ्या त्यासाठी नेमकं काय करायचं?

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

तुमच्या कामाचा भाग म्हणून काही माहिती गुप्त ठेवणं ही गरज असेल तर तुम्हांला मायक्रोसॉफ्ट वर्ड (Microsoft Word) किंवा ऑफिस अ‍ॅप्समध्ये या महितीची फोल्डर्स पासवर्ड देऊन सुरक्षित ठेवणं गरजेचे आहे. अतिशय महत्त्वाची माहिती असलेली डॉक्युमेंट्स जर तुम्ही पब्लिक फोल्डर किंवा इतरांना सहज अ‍ॅक्सेस मिळेल असा फोल्डर्समध्ये ठेवणार असाल तर त्या तुमच्या पुरत्या किंवा काही ठराविक लोकांना पासवर्ड टाकून ओपन करता येतील अशी सुरक्षा त्याच्याभोवती निर्माण करा. ऑफिस अ‍ॅपमध्ये त्यासाठी पासवर्ड सेट करण्याची विशेष सोय आहे. मग तुम्हांलाही तुमची काही माहिती अशा प्रकारे साठवायची असेल किंवा सुरक्षितपणे शेअर करायची असेल तर जाणून घ्या त्यासाठी नेमकं काय करायचं?

मायक्रोसॉफ्टमध्ये अशाप्रकारे फाईल सेव्ह आणि सुरक्षित ठेवण्यासाठी दमदार पासवर्ड ठेवणं आवश्यक आहे. मग तुम्ही मॅक बूक वापरत असाल किंवा अगदी विंडोज वापरत असाल तरीही साधारण सारख्याच पद्धतीने तुमची डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवता येतात.

विंडोज मध्ये डॉक्युमेंट सुरक्षित कशी ठेवाल?

यामुळे आता तुमचं डॉक्युमेंट सुरक्षित झालं असेल. त्याला पासवर्ड एंटर केल्याशिवाय कुणी उघडू शकत नाही.

मॅक मध्ये डॉक्युमेंट सुरक्षित कसं ठेवाल?

तुम्ही डॉक्युमेंट मॉडिफाय करण्यासाठी देखील पासवर्ड सेट करू शकता. WhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअ‍ॅपवरील संवाद सुरक्षित.

तुमच्या मॅक बूक, कंम्प्युटर किंवा डेस्कटॉपवर अशाप्रकारे डॉक्युमेंट सुरक्षितपणे सेव्ह करता येऊ शकतात. यामुळे माहिती चोरली जाण्याचा धोका कमी होतो. दरम्यान याच स्टेप्स वापरून तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रमाणेच एक्सेल आणि पॉवर पॉंईंटमध्येही तुमची डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवू शकता.