फोनमधील फोटो Delete झाल्यास तुम्हाला परत मिळवता येणार, Android साठी येणार नवं दमदार फिचर

मात्र काही अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये Recycle Bin या ऑप्शन देण्यात येतो. परंतु हा ऑप्शन सर्वच स्मार्टफोन मध्ये असेल असे नाही.

सेफ्टी अॅप्स (Photo Credit : Pixabay)

जर तुमच्या स्मार्टफोनमधील महत्वाचे फोटो आणि व्हिडिओ डिलिट झाल्यास ते तुम्हाला पुन्हा मिळवणे थोडे कठीणच होऊन बसते. मात्र काही अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये Recycle Bin या ऑप्शन देण्यात येतो. परंतु हा ऑप्शन सर्वच स्मार्टफोन मध्ये असेल असे नाही. त्यामुळे गुगल कडून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक मार्ग शोधून काढला आहे. गुगलने Android11 सह Recycle Bin फिचर सर्व स्मार्टफोनध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. अॅन्ड्रॉइड11 च्या अपडेटसह जवळजवळ सर्वच अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनध्ये हे फिचर्स युजर्सला देण्यात येणार आहे. त्यामुळे जरी तुमच्या फोनमधील फोटो किंवा व्हिडिओ डिलिट झाल्यास ते तुम्हाला पुन्हा मिळवता येणार आहेत. या फिचर्सचा फायदा मात्र सध्याच्या लेटेस्ट अपडेटचे नोटिफिकेशन मिळणाऱ्या युजर्सलाच होणार आहे.

युजर्सला हे नवे फिचर मिळाल्यानंतर फोनमधील जे फोटो किंवा व्हिडिओ डिलिट झाले आहेत ते रिसायकल बिन येथून पुन्हा मिळवता येणार आहेत. मात्र हे फोटो किंवा व्हिडिओ फक्त 30 दिवसच राहणार असून त्यानंतर ते अपोआप डिलिट होणार आहेत. म्हणजेच युजर्सला फोटो आणि व्हिडिओ पुन्हा मिळवण्यासाठी फक्त 30 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.(WhatsApp मुळे स्मार्टफोनमधील स्टोरेज अधिक व्यापला जातोय? युजर्ससाठी लॉन्च होणार एक नवे टूल)

खरंतर गुगलच्या Photos अॅप मध्ये हे फिचर आधीपासूनच अस्तित्वात आहे. जर तुम्ही एखादा फोटो किंवा व्हिडिओ डिलिट केल्यास तो Trash या फोल्डरमध्ये जातो. येथे ती फाइल जवळजवळ 60 दिवस कायम राहते. युजर्सला कधी ही फोटो रिस्टोर करता येऊ शकतात. Android11 मध्ये युजर्सला इन-बिल्ड स्क्रिन रेकॉर्डर, व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या वेळी नोटिफिकेशन म्यूट करणे, टच सेंसिटिव्हिटी वाढवणे, नोटिफिकेशन हिस्ट्री सारखे अन्य दमदारा फिचर्स सुद्धा मिळणार आहेत.