WhatsApp Privacy Policy नकोशी? मग सर्व्हर वरून व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट, Messages असे करा कायमचे बंद!

व्हॉट्स अ‍ॅप डीलीट करून अन्य काही मेसेजिंग अ‍ॅप भविष्यात वापरण्याचा विचार करत असाल तर पहा सर्वर वरून सारा डेटा कायमचा काढून टाकत नेमकं व्हॉट्स अ‍ॅपचं अकाऊंट डिलीट कसं करता येईल?

WhatsaApp (Photo Credits: Pxfuel)

WhatsApp ने नुकतीच त्यांची टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसी अपडेट करताना ग्राहकांनी ती मान्य करावी अथवा अकाऊंट करावं असे दोन पर्याय दिले आहेत. या नव्या नियमामुळे 8 फेब्रुवारी पासून जर तुम्हांला व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी मान्य नसेल तर ते अकाऊंट बंद केले जाणार आहे. मग तुम्ही देखील या द्विधा मनस्थितीमधून जात असताना व्हॉट्स अ‍ॅप डीलीट करून अन्य काही मेसेजिंग अ‍ॅप भविष्यात वापरण्याचा विचार करत असाल तर पहा सर्वर वरून सारा डेटा कायमचा काढून टाकत नेमकं व्हॉट्स अ‍ॅपचं अकाऊंट डिलीट कसं करता येईल? WhatsApp लवकरच सादर करणार multi-device support हे नवे फिचर; पहा काय आहे खासियत.

व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट कायमचं डिलीट कसं करायचं?

(नक्की वाचा: WhatsApp Group Chats, User Profiles गूगल सर्च रिझल्ट वर दिसत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, मात्र आता Issue सोडवल्याची व्हॉट्सअ‍ॅपची माहिती)

एकदा तुमचं अकाऊंट डिलीट झाले की आपोआपच व्हॉट्सअ‍ॅप वरून तुमचं अकाऊंट बंद केले जाते. तुमची मेसेज हिस्ट्री काढून टाकली जाते. तुम्हांला सार्‍या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वरून हटवलं जातं. तसेच गूगल ड्राईव्ह बॅकअप देखील डिलीट केले जातात. दरम्यान तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये काही महत्त्वाची माहिती असेल तर तुम्हांला बॅकअप घेता येऊ शकतो. त्यामुळे अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी तो बॅकअप घ्यायला विसरू नका.