How to Create Facebook Avatar: फेसबुकवर तयार करा आपला अ‍ॅनिमेटेड 'अवतार'; FB ने भारतात लॉन्च केले मजेशीर फीचर, जाणून घ्या कसे वापराल

'अवतार' (Avatar) नावाचे हे नवीन फिचर फेसबुक अ‍ॅपच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये समाविष्ट केले गेले आहे.

Facebook Avatars Launched in India (Photo Credits: Twitter)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) ने वापरकर्त्यांसाठी एक मजेदार फीचर (Fun Feature) आणले आहे, ज्यामुळे आपण आपले स्वत: चे व्हर्च्युअल कार्टून किंवा अ‍ॅनिमेटेड कॅरॅक्टर तयार करू शकाल. 'अवतार' (Avatar) नावाचे हे नवीन फीचर फेसबुक अ‍ॅपच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये समाविष्ट केले गेले आहे. आता बरेच लोक याच्या मदतीने स्वत: चे नवीन व्हर्जन डिझाइन करीत आहेत. आपण फेसबुकद्वारे तयार केलेला हा ‘अवतार’ स्टिकर म्हणून चॅट्समध्ये आणि कमेंट्समध्ये शेअर करू शकता. सध्या लॉक डाऊनमुळे देशात इंटरनेटचा वापर वाढला आहे, त्यामुळे फेसबुकने हे नवीन फीचर सादर केले आहे.

हे नवीन ‘अवतार’ फीचर खास भारतीय वापरकर्त्यांसाठी तयार केले आहे. यामध्ये अनेक चेहरे, केशरचना आणि पोशाखांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकदा का तुम्ही तुमचा ‘अवतार’ तयार केला, की, वापरकर्ते त्यांचा चेहरा स्टिकर म्हणून मेसेंजरवर किंवा कमेंट्समध्ये वापरू शकतील. बरेच  दिवस या फीचरवर काम केल्यानंतर, फेसबुकने गेल्या वर्षी ‘अवतार’ची चाचणी सुरू केली होती. सर्वात आधी स्नॅपचॅटच्या Bitmoji चा असा कॉन्सेप्ट दिसला होता. फेसबुकचे हे फीचर वापरुन तुम्ही तुमचा ‘अवतार’ करून कोठेही तो वापरू शकता. आपण तो व्हॉट्सअ‍ॅपवर स्टिकर्स म्हणून पाठवू शकता किंवा आपण आपला प्रोफाईल फोटो बनवू शकता.

Facebook Avatars (Photo Credits: Twitter)

जाणून घ्या कसे बनवाल तुमचा 'अवतार' -

किंवा फेसबुक अ‍ॅप मधील बुकमार्क (Bookmarks) विभागात 'Avatar Creator' शोधा. अवतार तयार झाल्यानंतर आपल्याकडे सेव्ह करण्याचा पर्याय असेल. हवे असल्यास, आपण हे फेसबुकवर देखील शेअर करू शकता. (हेही वाचा: WhatsApp वर तुम्ही जास्त कोणात्या व्यक्तीसोबत बोलता हे पाहण्यासाठी 'या' ट्रिक्स वापरा)

फेसबुकने प्रथम ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वापरकर्त्यांसाठी हे फीचर सादर केले होते, त्यानंतर युरोप आणि अमेरिकेत याची सुरूवात झाली. मेसेंजरमध्ये अवतारची निर्मिती सध्या केवळ Android वर उपलब्ध आहे, परंतु लवकरच ती iOS वरही आणली जाईल.