ट्वीटरवर आजच्या दिवशी 13 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 ऑगस्ट 2077 मध्ये #hastags ची सुरुवात झाली होती. तेव्हापासून ते आपापर्यंत प्रत्येक ट्वीटच्या सोबत हॅशटॅगचा वापर केला जात आहे. सध्याच्या काळात देशातील प्रत्येक लहान गोष्ट सुद्धा शेअर करण्यासाठी हॅशटॅग वापरला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, ट्वीटरवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये येण्यासाठी हॅशटॅग फार महत्वाचा मार्ग आहे. जर योग्य शब्दासह हॅशटॅग तयार केल्यास तो ट्रेडिंग लिस्टमध्ये येण्याची शक्यता अधिक असते. याच कारणास्तव आम्ही तुम्हाला हॅशटॅग तयार करण्यास मदत करणार आहोत.
हॅशटॅगचा वापर करण्यापूर्वी कोणता ट्रेन्ड ट्वीटरवर सुरु आहे ते पहा. त्यानंतर तुम्ही ट्रेन्ड होत असलेला किवर्ड वापरुन तुमचे ट्वीट करु शकता. तर येथे पहा हॅशटॅगचा कसा वापर कराल-(Truecaller Spam Activity Indicator: अॅनरॉईड युजर्ससाठी Truecaller चे नवे फिचर; स्पॅम नंबरची अॅक्टीव्हीटी पाहता येणार)
>>कोणताही हॅशटॅग तयार करण्यासाठी योग्य ट्वीटर मेसेजच्या येथे किवर्ड किंवा शब्दाच्या येथे # असे Symbol वापरा.
>>कोणत्याही मेसेजच्या हॅशटॅगवर क्लिक केल्यास तुम्हाला तेथे त्या संबंधित ट्वीटरवरील पोस्ट दिसून येतील. त्यामुळेच योग्य हॅशटॅग असणे फार महत्वाचे आहे.
>>हॅशटॅगचा वापर करताना स्पेसचा देऊ नका. दुसरा हॅशटॅगच्या वेळी मात्र स्पेस देऊन पुन्हा किवर्ड वापरु शकता. हॅशटॅग तयार करताना काही कॅरेक्टर्स जसे , . ; ? ! यांचा वापर करु नका.
अशा पद्धतीने तयार करा हॅशटॅग
>>हॅशटॅग Symbol # पूर्वी कोणताही शब्द किंवा क्रमांकाचा वापर करु नका. # पूर्वी स्पेस देणे गरजेचे आहे. जर तुम्ही 123#sofun किंवा word#sofun हॅशटॅग तयार केल्यास तुम्ही सर्च लिस्टमध्ये दिसणार नाहीत. यासाठी नेहमीच तुम्हाला #sofun असा हॅशटॅग तयार करावा लागणार आहे.
>>संपूर्ण हॅशटॅग हा क्रमांकाचा असल्यास तो अवैध धरला जातो. त्यामुळे जरी तुम्हाला क्रमांक वापरुन हॅशटॅग तयार करायचा असल्यास तो तुम्ही #123go या ऑप्शनचा वापर करु शकता.
तर वरील काही गोष्टींसह व्यक्तीगत ट्वीट किंवा पब्लिक अकाउंटच्या हॅशटॅगसह ट्वीट केल्यास त्या संबंधित हॅशटॅग सर्च केले जाता. त्यामुळे तेव्हा तुमच्या हॅशटॅगसह ट्वीटसह दिसून येणार आहे. त्याचसोबत प्रसिद्ध हॅशटॅग Twitter च्या ट्रेन्डिंग टॉपिक्स येथे दिसतात. हॅशटॅग केस सेंसेटिव्ह नसतात. मात्र जर हॅशटॅगनंतर Capital Letter पासुन सुरुवात केल्यास तो वाचणे सोपे होते. ट्वीटरकडून अधिक हॅशटॅग वापरु नये असा सल्ला दिला जातो. परंतु तुम्हाला हवे तेवढे हॅशटॅग वापरु शकता.