IPL Auction 2025 Live

घरबसल्या 'असा' बदला तुमच्या आधार कार्डवरील पत्ता

घरबसल्या तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील पत्ता बदलू शकता. तसेच पत्ता बदण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डवरील पत्ता अपडेट करू शकता.

Aadhar Card (Photo Credits: PTI)

तुमच्या आधार कार्डवर (Aadhaar Card) तुमचा जुना पत्ता आहे आणि तो तुम्हाला बदलायचा आहे का? आता त्यासाठी तुम्हाला कोठेही बाहेर किंवा रांगेत उभं राहण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील पत्ता बदलू शकता. तसेच पत्ता बदण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डवरील पत्ता अपडेट करू शकता. यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक असणे गरजेचे आहे. ज्या आधारकार्ड धारकाचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला नाही, त्यांना ऑनलाईन पद्धतीने आपला नवा पत्ता आधार कार्डवर अपडेट करणे शक्य होणार नाही. चला तर मग आज या लेखातून आपण आधार कार्डवरील पत्ता कसा बदलावा हे जाणून घेऊयात.

असा करा आधारकार्डवरील पत्ता अपडेट -

हेही वाचा - PAN-Aadhaar Card Linking: 31 डिसेंबर च्या आधी पॅन-आधार कार्डशी लिंक करणे आहे अनिवार्य; 'या' सोप्प्या स्टेप्स वापरून आजच पूर्ण करा काम

त्यानंतर आधार कार्ड धारकाला संबंधित पत्त्यावर एक सांकेतिक क्रमांक पत्राच्या माध्यमातून पाठविला जातो. तो योग्य पद्धतीने भरल्यावर पत्ता अपडेट करण्याची विनंती मंजूर केली जाते.

वरील पद्धतीचा अवलंब करून तुम्ही पत्ता अपडेट करू शकता. तसेच या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊनही पत्ता अपडेट करू शकता. यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. आधार केंद्रात तुमच्या कागदपत्राची तपासणी करून तुमचा पत्ता अपडेट केला जातो.