अरे वाह! Apple कंपनीकडून होम सर्व्हिसची घोषणा; आता गॅजेट्स दुरुस्ती करायला घरी येणार इंजिनिअर
वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, Apple आता आपल्या घरी येईल आणि आयफोन, आयपॅड, लॅपटॉप किंवा मॅकबुक दुरुस्त करेल
फोन दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्यात वेळ खर्च होत आहे, किंवा तिथे तुमचा फोन तुम्हाला ठेवायचा नाही किंवा आपणास सर्व्हिस सेंटरमध्ये जायचच नाही, तर ही बातमी आपल्यासाठी आहे, कारण तंत्रज्ञान दिग्गज कंपनी Apple ने होम सर्व्हिसची घोषणा केली आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, Apple चे लोक आता आपल्या घरी येईल आणि आयफोन, आयपॅड, लॅपटॉप किंवा मॅकबुक दुरुस्त करेल. Apple च्या सपोर्ट पेजवरील माहितीनुसार, Apple चे अधिकृत इंजिनिअर आपल्या घरात येऊन आपल्या गॅझेटची दुरुस्ती करतील.
जर तुम्हाला कोणत्याही Apple उत्पादनाबद्दल तक्रार असेल, तर आपण Apple च्या सपोर्ट पेजवर जा, तुमचे उत्पादन निवडा त्यानंतर नक्की काय समस्या आहे ती मांडा. त्या समस्येचे निवारण करण्यासाठी Apple चा माणूस तुमच्या घरी दाखल होईल. गो टेक सर्व्हिसेसमार्फत Apple कडून ही दुरुस्तीची ऑफर दिली जात आहे. नवीन Apple सेवा सध्या शिकागो, डॅलस, ह्युस्टन, लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपलब्ध आहे. लवकरच अन्य देशांमध्येही ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: खोट्या फोनच्या बदल्यात नवे फोन उकाळून, Apple कंपनीला लाखो रुपयांचा गंडा; दोन चीनी विद्यार्थ्यांचा प्रताप)
दरम्यान, Apple ने अलीकडेच दोन वर्षांनंतर भारतीय बाजारात आपला सर्वात खास स्मार्ट स्पीकर होमपॉड (Apple Homepod) आणला आहे. 2017 मध्ये Apple ने जागतिक स्तरावर हा स्मार्ट स्पीकर सादर केला, जो लोकांना प्रचंड आवडला होता. पण त्यावेळी हे उत्पादन भारतात सादर झाले नव्हते. आता Apple होमपॉडचे पेजही कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर लाइव्ह झाले आहे. याक्षणी, कंपनीने अद्याप या डिव्हाइसच्या सेलबद्दल अधिक माहिती शेअर केलेली नाही.