Hiring Surge in India: भारतात रोजगाराच्या संधी वाढल्या; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशात सर्वाधिक 7% नोकरभरतीची अपेक्षा - अहवाल
देशातील तरूणांच्या हाताला काम मिळत आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशात सर्वाधिक 7% नोकरभरतीची अपेक्षा एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
Hiring Surge in India: भारतातील रोजगाराच्या दृष्टीकोनातून ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीसाठी (Q4 2024) जगभरातील सर्वात मजबूत आहे. जो चालू जुलै-सप्टेंबर तिमाही (Q3) च्या तुलनेत 7 टक्क्यांनी लक्षणीय सुधारणा दर्शवित आहे. एका अहवालात मंगळवारी दिसून आले. या अहवालात सर्व क्षेत्रातील नोकरभरतीची(Employment) नोंद करण्यात आली आहे. ज्यात नोकर भरतीचा(Job) सकारात्मक हेतू दर्शवला आहे. 'एम्प्लॉयमेंट आउटलुक सर्वेक्षण' नुसार, फायनान्शियल आणि रिअल इस्टेट क्षेत्रात 47 टक्के नोकरभरतीची अपेक्षा आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात(46 टक्के)नोकरभरतीची अपेक्षा आहे.
औद्योगिक आणि साहित्य क्षेत्रात (36 टक्के) नोकरभरतीची अपेक्षा आहे. ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवा क्षेत्रात (35 टक्के) नोकरभरतीची अपेक्षा आहे. दळणवळण सेवांमध्ये (28 टक्के) नोकरभरतीची अपेक्षा आहे. भारताच्या उत्तरेकडील भागात नोकरीच्या 41 टक्के नोकरीच्या संधींच्या वाढीचा अंदाज आहे, त्यानंतर पश्चिमेकडील भआगात (39 टक्के) आहे. (हेही वाचा:Employment In India: भारतात 2023-24 मध्ये 4.7 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या; मागील वर्षाच्या तुलनेत 6% वाढ- RBI Data )
मॅनपॉवरग्रुप इंडिया आणि मिडल ईस्टचे व्यवस्थापकीय संचालक, संदीप गुलाटी यांनी म्हटले की, 'देश सध्या आर्थिक स्थितीतील सकारात्मक दृष्टीकोनात आहे. भारताची परराष्ट्र धोरणे, मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांच्या विकास, निर्यात क्षेत्रातील मजबूतीकरण यामुळे देश प्रगतीपथावर आहे.' (हेही वाचा: EPFO New Schemes For Employment: रोजगारनिर्मितीसाठी ईपीएफओ द्वारे तीन नव्या योजना; अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पातही घोषणा)
"याच्या जोडीने लोकसंख्या आहे. ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत आमची स्पर्धात्मकता वाढते. संदीप गुलाटी पुढे म्हणाले की, अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या सरकारी योजना, आउटसोर्सिंग सेवांची वाढती मागणी आणि मॅन्युफॅक्चरिंग बूम यावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे.
बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकासावर अधिक लक्ष केंद्रित केल्याने, भारत बेरोजगारी कमी करू शकते त्याशिवाय, उदयोन्मुख उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक सक्षम आणि कौशल्यपूर्ण कर्मचारी निर्माण करून आर्थिक विकासाचा वेग वाढवू शकतो, असे अहवालात नमूद केले आहे. मागील तिमाहीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास, आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान (-6 टक्के) व्यतिरिक्त, इतर सर्व क्षेत्रांनी सकारात्मक वाढ दर्शविली आहे, असेही अहवालात म्हटले आहे.