सावधान! WhatsApp च्या 'या' Bug मुळे हॅकर्स चोरु शकतात तुमचा पर्सनल डेटा

गेल्या काही काळामध्ये युजर्सची सुरक्षितता आणि प्रायव्हसी लिक करण्यासाठी हॅकर्सने व्हॉट्सअॅपला टार्गेट केले होते.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

टेक जाएंट फेसबुकची (Facebook) मत्तेदारी असलेले लोकप्रिय चॅटिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) सध्या हॅकर्सच्या (Hackers) रडारावर आहे. गेल्या काही काळामध्ये युजर्सची सुरक्षितता आणि प्रायव्हसी लिक करण्यासाठी हॅकर्सने व्हॉट्सअॅपला टार्गेट केले होते. आता व्हॉट्सअॅप हॅक करण्यासाठी हॅकर्सने नवीन तंत्र शोधून काढले आहे. यामध्ये हॅकर्स इमेज फिल्टरचा (Image Filters) वापर करत आहेत. युजर्सने हा इमेज फिल्टर वापरल्यास हॅकर्संना युजर्सच्या खाजगी माहिती मिळू शकते.

व्हॉट्सअॅप इमेज फिल्टरमुळे होणाऱ्या हँकिंगबद्दलची माहिती रिसर्चर  Gal Elbaz आणि Dikla Barda यांनी दिली आहे. जेव्हा युजर व्हॉट्सअॅपमध्ये हे फिटर अप्लाय करतो तेव्हा हॅकरला युजरच्या व्हॉट्सअॅप मेमरीचा अॅक्सेस मिळतो. या व्हॉट्सअॅप मेमरीमध्ये युजरचा महत्त्वपूर्ण डेटा हॅकरला सहजरित्या घेता येऊ शकतो. चेक पॉईंट रिसर्च यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकने सव्हर्स थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्सना read-write अॅक्सेस बंद केला आहे. त्यामुळे हॅकर्स व्हॉट्सअॅप मेमरीमधील महत्त्वपूर्ण डेटा मिळवू शकणार नाहीत. (WhatsApp ने लॉन्च केले Money Heist Animated Stickers; डाऊनलोड कसे कराल? वापरायचे कसे? इथे घ्या जाणून)

हा बग व्हॉट्सअॅपच्या इमेज फिल्टरची मदत घेऊन युजरला एक नवीन इमेज दाखवतो आणि त्यामुळे हॅकरला युजरचे अकाऊंट आणि व्हॉट्सअॅप मेमरी मधील युजर डेटा मिळवण्यास मदत होते. सिक्युरिटी फर्मने दिलेल्या माहितीनुसार या बगची माहिती व्हॉट्सअॅपला 10 नोव्हेंबर 2020 रोजी देण्यात आली होती. यानंतर व्हॉट्सअॅपने हा बग ओळखून यावर तोडगा काढत व्हॉट्सअॅपचे नवीन व्हर्जन 2.21.1.13 जानेवारी 2021 मध्ये लॉन्च केले. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन व्हर्जनमध्ये हॅकर्संना व्हॉट्सअॅप मेमरीमधील डेटा घेणे शक्य होणार नाही.