ऑनलाईन खरेदीवर अशा पद्धतीने असते गुगल ची करडी नजर

गुगल (Google)तुमच्या खाजगी जीमेल(Gmail)अकाउंटवर पाठविल्या गेलेल्या रिसीप्ट च्या माध्यमातून तुमच्या ऑनलाईन खरेदीवरती नजर ठेवतो

गुगल (Photo Credit: Shutterstock)

गुगल (Google)तुमच्या खाजगी जीमेल(Gmail)अकाउंटवर पाठवल्या गेलेल्या रिसीप्ट च्या माध्यमातून तुमच्या ऑनलाईन खरेदीवरती नजर ठेवतो. सीएनबीसी(CNBC)मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, यासंबंधीची माहिती यूजर्सला खाजगी वेब टूलच्या माध्यमातून उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, हे वेब टूल तुमचा डाटा गोपनीय ठेवतो.

गुगल ने अलीकडेच स्पष्ट केले की, आपण ह्या माहितीचा उपयोग कोणत्याही जाहिरातीसाठी करत नाही. कंपनीने 2017 मध्ये सांगितले होते की, तो जीमेल संदेशाद्वारे जमा झालेला डाटाचा उपयोग खाजगी जाहिरातीमध्ये करणे बंद करेल.

त्याचबरोबर गुगलने असेही सांगितले होते की, "तुम्हाला एका टप्प्यावर तुम्ही केलेल्या खरेदी , बुकिंग किंवा सब्सक्रिप्शनवर अगदी सहजपणे लक्ष ठेवता यावे यासाठी गुगलने एक व्यक्तिगत केंद्र बनवले आहे, जे फक्त तुम्हीच पाहू शकता."

मुंबईकर 'अब्दुल्ल खान'ला Google चं 1.2 कोटीचं पॅकेज; ना जॉब अ‍ॅप्लिकेशन, ना IIT चा विद्यार्थी, पहा तरीही कशी मिळाली इतकी मोठी संधी

कंपनीने पुढे असेही म्हटले की, "तुम्ही ही माहिती कधीही डिलीट करु शकता. आम्ही तुम्हाला जाहिरात देण्यासाठी तुमच्या जीमेल अकाउंटवरुन ईमेल रिसीप्ट आणि पर्चेस पेजवर कन्फर्मेशन मेसेजसह कोणत्याही माहितीचा गैरवापर करत नाही." मात्र गुगलने अद्याप हे नाही, स्पष्ट केले की, हे टूल किती काळ सक्रिय असेल.