Google Photos ची मोफत Unlimited Storage सेवा जून 2021 ला संपणार; स्टोरेज स्पेस सब्सक्रिप्शन साठी असे आहेत सशुल्क प्लॅन्स!

गूगलने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता जून 2021 पासून तुम्हांला 15 जीबी पेक्षा अधिक फोटो गूगल फोटो अ‍ॅप मध्ये साठवता येणार नाहीत.

Google (Photo Credits: IANS)

गूगलने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता जून 2021 पासून तुम्हांला 15 जीबी पेक्षा अधिक फोटो गूगल फोटो अ‍ॅप (Google Photo)  मध्ये साठवता येणार नाहीत. युजरने मर्यादा पार केल्यास त्यांना त्या सेवेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या प्रत्येक युजरला गुगल अकाऊंटसोबत 15 जीबी स्टोरेज (Google Account storage) मोफत दिले जाते. मात्र त्यापुढे स्टोरेज हवी असल्याच गुगलच्या इतर सेवांप्रमाणेच आता युजरला पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या जीमेल आणि ड्राइव्हसाठी सशुल्क सेवा दिली जात आहे तशीच सेवा फोटो अ‍ॅपसाठी देखील लागू असेल.

दरम्यान गुगलने दिलेल्या माहितीनुसार जर हे फोटो जून 2021 च्या पूर्वीचे असतील तर त्यासाठी शुल्क आकारले जानार नाही. पूर्वीच्या फोटो आणि व्हिडिओसाठी अधिक पैसे न देता त्यांना मुभा दिली जाणार आहे. मात्र 1 जून 2021 नंतर तुमच्या हाय रेझ्युलेशन फोटो, व्हिडीओमुळे स्पेस संपत असेल तर युझरला गूगलचे सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार आहे.

गूगलचं ट्वीट

तुम्ही गूगलच्या नियमांप्रमाणे मर्यादा पार केली असेल तर तुम्हांला त्याचा इमेल येईल. तसेच 15 जीबी पेक्षा अधिक स्टोरेजसाठी पैसे मोजावे लागतील. हा दर प्रत्येक महिन्यांसाठी 130 रूपये तर वर्षासाठी 1300 रूपये आहे. तर 30 टीबीच्या प्लॅनसाठी 19,500 रूपये मोजावे लागतील. या सब्सक्रिप्शनमध्ये तुम्हांला गूगल 100 जीबी स्टोरेज स्पेस देणार आहे.