Google Reinstates Delisted Indian Apps: सरकारी हस्तक्षेपामुळे गुगलने पुन्हा Restored केले Naukri, 99acres अॅप्स

यात Naukri, 99acres, Naukri Gulf या अॅप्सचा समावेश आहे. पीपल ग्रुपचे मॅट्रिमोनी ॲप शादी हे देखील सरकारच्या हस्तक्षेपानंतर शनिवारी दुपारी प्ले स्टोअरवर पुनर्संचयित करण्यात आले.

Naukri, 99acres (PC - Facebook)

Google Reinstates Delisted Indian Apps: तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी Google ने आपल्या Play Store वरून हटवलेले काही भारतीय ॲप्स पुन्हा पुनर्संचयित केले आहेत. सरकारने बैठक बोलावून वाद सोडवल्याने गुगलने हा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, सरकारचा काही ॲप्स हटवण्याच्या गुगलच्या निर्णयाला कडाडून विरोध आहे. Google ने Play Store वरून काही ॲप्स हटवल्याबद्दल सरकारचा कठोर दृष्टिकोन आहे. आम्ही ॲप्स हटवण्याची परवानगी देणार नाही.

दरम्यान, सरकारने हस्तक्षेपानंतर Google ने Info Edge India चे काही फ्लॅगशिप ॲप्स पुनर्संचयित केले आहेत. यात Naukri, 99acres, Naukri Gulf या अॅप्सचा समावेश आहे. पीपल ग्रुपचे मॅट्रिमोनी ॲप शादी हे देखील सरकारच्या हस्तक्षेपानंतर शनिवारी दुपारी प्ले स्टोअरवर पुनर्संचयित करण्यात आले. (हेही वाचा - Elon Musk Files Case Against OpenAI: एलोन मस्क यांनी ओपनएआय विरुद्ध दाखल केला खटला; CEO Sam Altman वर केला करार मोडल्याचा आरोप)

इन्फो एजचे सह-संस्थापक संजीव बिकचंदानी यांनी सांगितलं की, अनेक इन्फो एज ॲप्स प्ले स्टोअरवर परत आले आहेत. हितेश आणि संपूर्ण इन्फो एज टीमच्या नेतृत्वात हा एक प्रयत्न आहे. यासाठी लोक रात्रभर जागे होते. सरकारचा हस्तक्षेपामुळे प्रभावित कंपन्यांचे अॅप्स पुन्हा पुनर्संचयित करणे शक्य झाले. (वाचा - Leap Day 2024 Google Doodle: लीप डे २०२४ निमित्त गूगलचं खास डूडल)

तथापी, इंडस्ट्री बॉडी इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) ने गुगलच्या या निर्णयाचा निषेध केला. तसेच डिलिस्टेड ॲप्स रिस्टोअर करण्याची विनंती केली. Google ने शुक्रवार सांगितले की, ते आपले ॲप स्टोअर बिलिंग धोरण लागू करणार आहे. या निर्णयानुसार गुगलने गुगल प्ले स्टोअरवरून 99 एकर, नोकरी आदी अॅप्स काढून टाकले आहेत.