Google चे पहिलेच इअरबड्स Pixel Buds A भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन

पिक्सल बड्स ए हे या वर्षाच्या जून महिन्यात अमेरिकेत लॉन्च करण्यात आली. त्याची किंमत 99 डॉलर ठेवण्यात आली.

Google Pixel Buds A (Photo Credits-Twitter)

Google Pixel Buds A सीरिज इअरबड्स भारतात अधिकृतरित्या लॉन्च करण्यात आले आहेत. पिक्सल बड्स ए हे या वर्षाच्या जून महिन्यात अमेरिकेत लॉन्च करण्यात आली. त्याची किंमत 99 डॉलर ठेवण्यात आली. मात्र आता हेच इअरबड्स भारतात लॉन्च केले जाणार आहेत. गुगल पिक्सल बड्स ए सीरिज भारतात 9,999 रुपयात भारतात लॉन्च केले आहे. याची टक्कर ओप्पो इक्नो एक्स सोबत होणार आहे. ज्याची किंमत भारतात 10,999 रुपये आहे. पिक्सल बड्स ए सीरिज ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ड, रिलायन्स डिजिटल आणि Tata Cliq वर 25 ऑगस्ट पासून खरेदी करता येणार आहे, त्याचसोबत इअरबड्स हे रिटेल आउटलेट्सच्या माध्यमातून सुद्धा खरेदी करता येणार आहेत.

हे इअरबड्स व्हाइट कलर ऑप्शनमध्ये येणार आहेत. गुगल बड्स ए सीरिज इअरबड्स मध्ये 12mm डायनामिक स्पीकर ड्रायवर दिला आहे. इअरबड्समध्ये क्लिअर आणि नॅच्युरल साउंड मिळणार आहे. गुगलने दावा केला आहे की, पिक्सल बड्स ए सीरिज Spatial Vent आणि इन एअर प्रेशरसह येणार आहे. गुगल पिक्सल बड्स ए सीरिज इअरबड्समध्ये गुगल असिस्टंटचा सपोर्ट दिला आहे. त्याचसोबत वेदर सपोर्ट, वॉल्यूम चेंज, नोटिफिकेशन रीड आणि Ok Google कमांडचा सपोर्ट मिळणार आहे.(Asus ने भारतात लॉन्च केले आपले Online स्टोर, स्मार्टफोन ते लॅपटॉपच्या खरेदीवर मिळणार धमाकेदार बेनिफिट्स)

Tweet:

पिक्सल बड्स ए सीरिज इअरबड्समध्ये 40 लॅग्वेज ट्रान्सलेशनचा सपोर्ट दिला आहे. यामध्ये बंगाली, हिंदी आणि तमिळचा सपोर्ट दिला आहे. हा अॅन्ड्रॉइड फोन सपोर्टसग अॅन्ड्रॉइड 6.0 आणि त्यापेक्षा वरील वर्जनला सपोर्ट करणार आहे. गुगल पिक्सल बड्स ए सीरिज इअरबड्ससह फास्ट पेअरिंग, फाइंड माय डिवाइस, एडाप्टिव्ह साउंडचा सपोर्ट मिळणार आहे. बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास गुगल पिक्सल बड्स ए सीरिज इअरबड्समध्ये 5 तासांची बॅटरी लाइफ मिळणार आहे. इअरबड्समध्ये चार्जिंग केससह सिंगल चार्ज मध्ये 24 तासांचा सपोर्ट दिला आहे.