Google Pixel 4a चा स्मार्टफोन 3 ऑगस्टला होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना नव-नवीन फिचर्स मिळणार आहेत. सध्या कंपनीने फेसबुक आणि ट्विटर पेजवर 'Made by Google' हेडर इमेजेसमध्ये अपडेट केला आहे. या फोटोमध्ये व्हाईट बँकग्राऊंडमध्ये टॉप लेफ्ट कॉर्नरवर पंच-होल दिसत आहे.

Google Pixel 4a (PC - Twitter)

Google Pixel 4a: गुगल येत्या 3 ऑगस्टला Google Pixel 4a स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना नव-नवीन फिचर्स मिळणार आहेत. सध्या कंपनीने फेसबुक आणि ट्विटर पेजवर 'Made by Google' हेडर इमेजेसमध्ये अपडेट केला आहे. या फोटोमध्ये व्हाईट बँकग्राऊंडमध्ये टॉप लेफ्ट कॉर्नरवर पंच-होल दिसत आहे.

याशिवाय कंपनीने आपल्या ट्विटर हँडलचे नाव बदलून ते 'The Google RTing, Meme Loving, Info Sharing Stream' केलं आहे. गुगने स्टोर लँडिंग पेजची लिंकदेखील शेअर केली आहे. यात हा स्मार्टफोन 3 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. (हेही वाचा - Nokia ने लॉन्च केला 65 इंचाचा स्मार्ट टीव्ही, 6 ऑगस्ट पासून सेलसाठी ग्राहकांना होणार उपलब्ध)

Google Pixel 4a फिचर्स -

- हा एक Dual सिम Smartphone

- फोनमध्ये Qualcomm SDM730 Snapdragon 730 प्रोसेसर आहे.

- हा स्मार्टफोन 6 GB रॅमसह येतो.

- त्याशिवाय फोनमध्ये 64 GB अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.

- फोनमध्ये आपल्याला 3080 mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळत आहे.

- गूगल Pixel 4a मध्ये कनेक्टिव्हिटी पर्यायसुद्धा दिले गेले आहेत. जसे : ,GPS,Wifi,HotSpot,NFC,Bluetooth,

- फोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 12 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा मिळत आहे.

गूगल Pixel 4a s चा कॅमेरा ,,HDR, सारख्या उत्कृष्ट फीचर्ससह मिळत आहे.

जर स्मार्टफोनच्या फ्रंट फेसिंग कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात आपल्याला 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरासुद्धा मिळत आहे. यंदा कंपनी Google Pixel 4a, Pixel 4a 5G आणि Pixel 5 हे डिव्हाईस फोन लाँच करण्याची शक्यता आहे.