Google Map चे नवे अपडेट, ट्रेन-बस आणि सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीचे मिळणार Live Updates
त्याचसोबत Google Assistant Driving मोड सुद्धा रोलआउट केला आहे. गुगलच्या नव्या अपडेटमुळे अॅन्ड्रॉइड आणि iOS युजर्सला कोविड19 च्या संबंधित रियर टाइम इन्फॉर्मेशन मिळणार आहे.
गुगलकडून (Google) मंगळवारी कोविड19 संबंधित एक नवे अपडेट जाहीर करण्यात आले आहे. त्याचसोबत Google Assistant Driving मोड सुद्धा रोलआउट केला आहे. गुगलच्या नव्या अपडेटमुळे अॅन्ड्रॉइड आणि iOS युजर्सला कोविड19 च्या संबंधित रियर टाइम इन्फॉर्मेशन मिळणार आहे. म्हणजेच जर तुम्ही विकेंडला बाहेर जाण्यचा प्लॅन करत असल्यास तुम्हाला Google Map मधून कोणत्या सार्वजनिक ठिकाणी किंवा बस-ट्रेन सारख्या सार्वजनिक वाहतुकीत गर्दी आहे त्याचे लाईव्ह अपडेट्स मिळणार आहेत.
गुगल मॅपकडून युजर्सला गर्दीच्या ठिकाणांचे लाईव्ह अपडेट्स मिळणार आहे. तर गेल्या सात दिवसात कोरोनामुळे किती जणांचा बळी गेला हे सु्द्धा कळू शकणार आहे. गुगलने त्यांच्या ब्लॉगमध्ये असे म्हटले आहे की, फीचरच्या मदतीने लोकल अथॉरिटीच्या गाइडलाईन्स, टेस्टिंद साइट आणि लिंकची माहिती दिली जाणार आहे. ही माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळणार आहे. त्याचसोबत एखाद्या परिसरातील ऑल टाइम डिडेक्ट केस बद्दल ही सांगितले जाणार आहे.(फोन हरवल्यास किंवा खराब झाल्यास Important Contacts पुन्हा मिळवण्यासाठी काळजी करु नका, 'या' पद्धतीचा वापर करा)
हे फिचर अशा वेळी रोलाआउट करण्यात आले आहे ज्यावेळी पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दिल्लीतील सरकारकडून गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला जाऊ शकतो. अशातच गुगल मॅपचे हे नवे फिचर युजर्सला कामी येणार आहे. या फिचरच्या व्यतिरिक्त युजर्सला डिलिव्हरी ऑर्डर सुद्धा लाईव्ह पाहता येणार आहे.त्यानुसार, युजर्सला संभावित ऑर्डरचा डिलिव्हरी टाइम, पिकअप टाइम अशी माहिती दिली जाणार आहे. तसेच वेटिंग टाइम, डिलिव्हरी चार्जेज बद्दल ही सांगितले जाणार आहे. गुगल मॅपच्या मदतीने आपल्या आवडीचे फूड रिऑर्डर सुद्धा करता येणार आहे. हे फिचर अॅन्ड्रॉइड आणि iOS च्या भारतीय, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेच्या युजर्सला उपलब्ध करुन दिले आहे.