Google Invest in Bharti Airtel: गुगल करणार एअरटेलमध्ये 100 कोटी डॉलरची गुंतवणूक, स्वस्त स्मार्टफोन करणार तयार

रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसा, गुगल भारतीय टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलमध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

Google and Airtel (Photo Credits-Twitter)

Google Invest in Bharti Airtel: गुगल आणि भारती एअरटेल आता एकत्रित मिळून स्वस्त स्मार्टफोन तयार करणार आहे. रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुगल भारतीय टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलमध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, स्मार्टफोनसह 5जी संदर्भात दोन्ही कंपन्यांनी हात मिळवला आहे.(FIR Against Google CEO: गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या विरोधात प्रोड्यूसर-डायरेक्टर सुनील दर्शन यांची एफआयआर)

रिपोर्ट्सनुसार, 100 कोटी डॉलरच्या या बड्या गुंतवणूकीत 70 कोटी डॉलर (5257 कोटी रुपये) च्या माध्यमातून गुगल भारती एअरटेल मध्ये आपला हिस्सा खरेदी करणार आहे. तसेच स्वस्त फोन आणि 5जी संदर्भात ही संशोधन करणार आहेत. शुक्रवारी फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुगलने भारती एअरटेलमध्ये 734 रुपये प्रति शेअरच्या भावावर 1.28 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. या व्यतिरिक्त 300 कोटी डॉलर (2253 हजार) ची गुंतवणूक ही काही वर्षांसाठी कमर्शियल करारांच्या आधारावर केली जाईल.(Airtel, Jio आणि Vi च्या 'या' प्लॅनमध्ये दररोज मिळणार 2GB डेटा, वार्षिक पॅकमध्ये होणार हजारोंची बचत; जाणून घ्या सविस्तर)

एअरटेलकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, गुगलसोबत करण्यात आलेल्या कराराअंतर्गत सर्व किंमतीतील स्मार्टफोन उपलब्ध केले जातील. दोन्ही कंपन्या मिळून भारतातील स्थानिक स्थितीनुसार 5जी नेटवर्कवर काम करणार आहे. दोन्ही कंपन्या एकत्रित मिळून देशातील उद्योगासाठी क्लाउड इकोसिस्टिमला चालना देणार आहे. दरम्यान, गुगल आणि एअरटेलमध्ये झालेल्या कराराचे गुंतणूकदारांनी स्वागत केले आहे. इंट्रा-डे मध्ये एनएसआयवर याचा भाव 706.95 रुपयांवरुन 721.95 रुपयांच्या भावावर पोहचला गेला.