धोकादायक असल्याने गुगलने काढून टाकले 85 अॅप्स; पहा संपूर्ण यादी

गुगलने तब्बल 85 अॅप्स हटवले आहेत. तसेच तुमच्या फोनमध्ये यापैकी एखादे अॅप असेल तर ते ताबडतोब काढून टाकण्यात यावे असे गुगलकडून सांगण्यात आले आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo: inquisitr)

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून गुगल (Google)कडे पहिले जाते. आजकाल प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी गुगलचा आधार घेतला जातो. यासाठी फायदा होतो तो गुगल प्लेस्टोअरचा. नुकतेच गुगलने परत एकदा स्टोअरवरून काही अॅप्लिकेशन्स हटवले आहेत. हे अॅप्स धोकादायक असून, त्यांच्यामुळे फोनमधून व्हायरस येऊ शकतो अथवा मालवेअरचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून गुगलने हे पाऊल उचलले आहे. यावेळी गुगलने तब्बल 85 अॅप्स हटवले आहेत. तसेच तुमच्या फोनमध्ये यापैकी एखादे अॅप असेल तर ते ताबडतोब काढून टाकण्यात यावे असे गुगलकडून सांगण्यात आले आहे. ही अॅप्स खेळ, टीव्ही, आणि रिमोट कंट्रोल सिम्युलेटर अॅप्स यांच्या रुपात आहेत. (हेही वाचा : लवकरच गुगल बंद करणार हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप)

अशा प्रकारची अॅप तुमच्या फोनमध्ये पूर्ण स्क्रीनभर जाहिरात दाखवून मोबाईलच्या बॅकग्राऊंडमध्ये चालू राहतात. याचसोबत तुमच्या फोनच्या अनलॉकिंग फंक्शन्सवरही ते नजर ठेवतात. अशाप्रकारे तुमच्या फोनमधील डेटा अथवा इतर माहितीची चोरीदेखील होऊ शकते. यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेच्या कारणावरून गुगलने ही अॅप्स हटवली आहेत. मात्र याधीच ही अॅप्स तब्बल 90 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आली आहेत. यापैकी ‘Easy Universal TV Remote; हे अॅप सर्वात जास्त म्हणजे 50 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

धोकादायक असल्याने गुगलने काढून टाकलेल्या अॅप्सची यादी -

- Prado Parking Simulator 3D

- TV WORLD

- City Extremepolis 100

- American Muscle Car

- Idle Drift

- Offroad Extreme

- Remote Control

- Moto Racing

- TV Remote

- A/C Remote

- Bus Driver

- Trump Stickers

- Love Stickers

- TV EN ESPAÑOL

- Christmas Stickers

- Parking Game

- TV EN ESPAÑOL

- TV IN SPANISH

- Brasil TV

- Nigeria TV

- WORLD TV

- Drift Car Racing Driving

- BRASIL TV

- Golden

- TV IN ENGLISH

- Racing in Car 3D Game

- Mustang Monster Truck Stunts

- TDT España

- Brasil TV

- Challenge Car Stunts Game

- Prado Car

- UK TV

- POLSKA TV

- Universal TV Remote

- Bus Simulator Pro

- Photo Editor Collage 1

- Spanish TV

- Kisses

- Prado Parking City

- SPORT TV

- Pirate Story

- Extreme Trucks

- Canais de TV do Brasil

- Prado Car 10

- TV SPANISH

- Canada TV Channels 1

- Prado Parking

- 3D Racing

- TV

- USA TV 50,000

- GA Player

- Real Drone Simulator

- PORTUGAL TV

- SPORT TV 1

- SOUTH AFRICA TV

- 3d Monster Truck

- ITALIA TV

- Vietnam TV

- Movies Stickers

- Police Chase

- South Africa TV

- Garage Door Remote

- Racing Car 3D

- TV

- TV Colombia

- Racing Car 3D Game

- World Tv

- FRANCE TV

- Hearts

- TV of the World

- WORLD TV

- ESPAÑA TV

- TV IN ENGLISH

- TV World Channel

- Televisão do Brasil

- CHILE TV

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now