Google Chrome चा वापर करत आहात? तर व्हा सावध, कारण सरकारने जाहीर केला 'हा' अलर्ट
कारण सरकारी एजेंसी कंप्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (CERT-In) कडून क्रोम युजर्ससाठी अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
जर तुम्ही गुगल क्रोमचा(Google Chrome) वापर करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण सरकारी एजेंसी कंप्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (CERT-In) कडून क्रोम युजर्ससाठी अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सध्याच्या गुगल क्रोमचा वापर हा सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. यामागे मुख्य कारण असे की, सीईआरटी-आयएन टीमला गुगल क्रोम मध्ये काही प्रकारच्या वल्नेरेबिलिटी आढळून आली आहे. सरकारी एजेंसीने गुगल क्रोमच्या 92.0.4515.131 वर्जनला धोकादायक असल्याची रेटिंग दिली आहे. याचा वापर सुद्धा बंद करण्याचा सल्ला युजर्सला दिला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, असे न केल्यास तुम्ही रिमोट अॅटकर्सच्या हल्ल्याचे शिकार होऊ शकता. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे वर्जन वापरत असाल तर तातडीने ते अपडेट करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
CERT-In कडून पीसी गुगल क्रोम युजर्सला चेतावणी दिली आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, सध्याच्या गुगल क्रोममध्ये अधिक प्रमाणात वल्नेरेबिलिटी आहे. ही वल्नेरेबिलिटी गुगल क्रोमच्या बुकमार्कमध्ये हीफ बफर ओवरफ्लो एरर, यु ऑक्टर फ्री एरर इन फाइल सिस्टिम API, ब्राउजर UI किंवा पेज इन्फो UI आणि अन्य कारणामुळे आहे.(Amazon’s Kindle: अॅमेझॉन किंडल्स डेटा चोरी करु शकतात हॅकर्स! पाहा कंपनी काय म्हणते?)
कसे कराल गुगल क्रोम अपडेट?
-सर्वात प्रथम तुमच्या कंप्युटरवर गुगल क्रोम ब्राउजर सुरु करा.
-टॉप राइट कॉर्नरला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा.
-आता Update Google Chrome ऑप्शन दिसून येईल त्यावर क्लिक करा.
-जर अपडेट बटण दिसून येत नसेल तर तुम्ही लेटेस्ट वर्जन असलेले क्रोम ब्राउजर वापरत आहात.
कसे ओळखाल क्रोम ब्राउजर अपडेटेड आहे की नाही?
-जर अपडेट पेडिंग असेल तर आयकॉन कलर मध्ये दिसेल.
-Green अपडेट हे दोन दिवसांपूर्वीच जारी केले होते.
-Orange अपडेट हे चार दिवसांपूर्वीचे असेल.
-Red अपडेट हे एक आठड्यापूर्वीचे असेल.
यापूर्वी CERT-In ने Apple iPhone आणि iPad युजर्सला आपल्या ऑपरेटिंग सिस्टिमला अपडेट करण्याचा सल्ला दिला होता. तर CERT-In ही मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (MeitY) अंतर्गत काम करणारी सरकारी एजेंसी आहे.