Gmail ‘Help Me Write’ फीचर आता Android, iOS वर उपलब्ध, पण कोणासाठी? घ्या जाणून

गातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गूगलमध्येही एआयची (AI) क्रेझ पाहायला मिळते आहे. परिणामी Google ने त्याच्या वार्षिक Google I/O 2023 इव्हेंटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित इतर वैशिष्ट्यांसह नवीन 'हेल्प मी राइट' (Help Me Write Feature) वैशिष्ट्याची घोषणा केली.

Artificial intelligence | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Google's AI 'Help Me Write' Feature: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial intelligence) सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. केवळ चर्चेचाच नव्हे तर सर्वसामान्यांपासून ते जगभरातील अव्वल समजल्या जाणाऱ्या कंपन्या आणि इंटरनेटवरही तो आकर्षणाचा आणि कामाचा विषय ठरतो आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गूगलमध्येही एआयची (AI) क्रेझ पाहायला मिळते आहे. परिणामी Google ने त्याच्या वार्षिक Google I/O 2023 इव्हेंटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित इतर वैशिष्ट्यांसह नवीन 'हेल्प मी राइट' (Help Me Write Feature) वैशिष्ट्याची घोषणा केली.

Google ने दिलेल्या माहितीनुसार, नवे फीचर AI-आधारित लेखन साधन म्हणून Gmail आणि Google Docs मध्ये कार्य करेल. मात्र, सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, Google AI-आधारित नवे फीचर नोंदणी केलेल्या Google Workspace वर उपलब्ध होणार असल्याचे समजते.हे आता iOS आणि Android वर वर्कस्पेस लॅब प्रोग्राममध्ये नोंदणी केलेल्या परीक्षकांसाठी उपलब्ध असणार असल्याचा दावा केला जातो आहे. (हेही वाचा, LinkedIn प्रोफाईलवर करता येणार Identity Verification; जाणून घ्या Feature आणि लिक्डइन ओळख पडताळणीची प्रक्रिया)

9to5Google च्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गूगलचे AI-संचालित हेल्प मी राइट वैशिष्ट्य Android आणि iOS साठी Gmail वर वर्कस्पेस लॅब टेस्टर्ससाठी रोल आउट करणे सुरू झाले आहे. आत्तापर्यंत, Gmail मध्ये हेल्प मी राइट वैशिष्ट्य केवळ डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी वर्कस्पेस लॅबचा भाग म्हणून उपलब्ध होते. हे वैशिष्ट्य वापरकर्त्याने दिलेल्या सूचनांवर आधारित मसुदा तयार करून ईमेल तयार करण्यात मदत करेल. आगामी काळात एआय तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. परंतू, त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांना धक्का बसेल तर नव्या नोकऱ्याही निर्माण होतील असे, अभ्यासकांनी आगोदरच म्हटले आहे.

'हेल्प मी राइट' या फीचर द्वारे वापरकर्त्याला लेखनावेळी Formalize, Elaborate, Shorten, I'm Feeling Lucky, आणि Write a Draft असे पर्याय मिळतात. याचा अर्थ असा की तुम्ही या वैशिष्ट्याचा वापर विविध वापराच्या लिखान कार्यसाठी करू शकता, विशेषत: जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार ईमेल लिहिण्यास त्रास होत असेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now