अनेकांचे दुकान बंद, काहींचे काम सुरु: तब्बल ४८ तासांसाठी संपूर्ण जगाचे Internet Shutdown होणार!
संपूर्ण जगाचे इंटरनेट ठप्प होण्याची शक्यता (संपादित प्रतिमा)

'डिजिटल वर्ल्ड'मधील युजर्ससाठी धक्कादायक बातमी आहे. इंटरनेट वापरताना तुम्हाला येत्या काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कदाचीत तुमची इंटरनेट सुविधा ४८ तासांसाठी ठप्पही होऊ शकते. होय!, पुढील ४८ तासांसाठी जगभरातील इंटरनेट बंद होणार असल्याचे वृत्त आहे. प्रमुख डोमेन असलेले सर्व्हर पुढील काही तासांसाठी आपल्या नियमीत देखभालीवर (मेंटेनन्स) असणार आहेत. ही देखभाल पूर्ण होण्यासाठी ४८ किंवा त्यापेक्षा अधिक तासांचा कालावधी लागू शकतो. तेव्हा, तुमचे काम इंटरनेटवर अवलंबून असेल तर, खबरदारीचा उपाय म्हणून आगोदरच काळजी घ्या....

Russia Todayने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील काही तासांमध्ये इंटरनेट युजर्सना नेटवर्क फेल्युअरच्या समस्येचा सामना करावा लागण्याची शक्यात आहे. कारण, प्रमुख डोमेन सर्व्हर आणि त्याच्याशी संबंधीत नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर काही काळासाठी डाऊन असतील. इंटरनेट बंद असणे हे नेटवर्क आणि इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्ससाठीसुद्धा परिणामकारक ठरु शकते.

इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अॅण्ड नंबर्स इंटरनेट बंद असलेल्या काळात 'क्रिप्टोग्राफिक की' बदलून नियमीत देखभालीचे काम करेन. त्यामुळे इंटरनेट की अॅड्रेस बुक किंवा डोमेन नेम सिस्टम (DNS)ला प्रेटेक्ट करण्यासाठी फायदेशीर ठरेल. ICANN ने म्हटले आहे की, सायबर हल्ल्याच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी देखभालीचे (मेंटेनन्स) काम करणे महत्त्वाचे ठरत आहे.

दरम्यान, एका प्रतिक्रियेत कम्युनिकेशन्स रेग्युलेटरी अथॉरिटी (CRA)ने म्हटले आहे की, ग्लोबल इंटरनेट शटडाउन हे सुरक्षा, स्थिर आणि साध्यासोप्या (लवचीक) डीएनएससाठी महत्त्वाचे आहे. पुढे बोलताना अथॉरिटीने म्हटले की, जर युजर्सचे नेटवर्क ऑपरेटर्स किंवा इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स (ISPs)या बदलासाठी तयार नसतील तर, काही इंटरनेट युजर्सना इंटरनेट वापरताना अडचण निर्माण होऊ शकते. दरम्यान, सिस्टम सिक्यॉरिटी एक्सटेन्शनला अनेबल करुन या अडचणींवर मात करता येऊ शकते.

इंटरनेट युजर्सला पुढील ४८ तासांमध्ये वेबपेज अॅक्सिस करण्यासाठी किंवा काही ट्रांजेक्शन्स करताना अडचण येऊ शकते. तसेच, युजर्स जर आऊटडेटेड ISPवापरत असेल तर, ग्लोबल नेटवर्क वापरताना त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.