Flipkart TV Days Sale: फ्लिपकार्टवर 15 हजार रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करता येणार 'हे' शानदार टीव्ही, जाणून घ्या अधिक

कारण ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वप TV Days Sale आज पासून सुरु झाला आहे.

Flipkart | Representational Image | (Photo Credit: Official)

Flipkart TV Days Sale: जर तुम्ही एखादा नवा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कारण ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वप TV Days Sale आज पासून सुरु झाला आहे. हा सेल येत्या 9 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. सेलमध्ये ग्राहकांना काही स्मार्ट टीव्ही हे त्यांच्या मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. ऐवढेच नाही तर टीव्हीवर आकर्षक ऑफर्स ही दिली जाणार आहे. ज्याचा लाभ घेत कमी किंमतीत टीव्ही तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तर जाणून घ्या फ्लिपकार्टच्या टीव्ही सेलमध्ये 15 हजारांहून कमी किंमतीत कोणते शानदार टीव्ही तुम्हाला खरेदी करता येणार आहेत.

फ्लिपकार्ट टीव्ही डेज सेलमध्ये जर तुम्ही एखादा टीव्ही खरेदी करत असाल तर आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर 5 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. हा डिस्काउंट EMI ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. या व्यतिरिक्त फ्लिपकार्ट बँक एक्सिस क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. त्याचसोबत नो कॉस्ट ईएमआयवर तो खरेदी करता येईल.(Samsung Level U2 वायरलेस ईयरफोन भारतात लाँच, याचा बॅटरी बॅकअप ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का)

सेलमध्ये Mi 4A Pro 32 इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये एचडी रेडी डिस्प्ले दिला जाणार आहे. हा अॅन्ड्रॉइड टीव्ही गूगल असिस्टंट सपोर्ट करणार आहे. यामध्ये DTS HD सह 20 स्पिकर दिला गेला आहे. तसेच डेटा आणि मल्टीपल पोर्टची सुद्धा सुविधा दिली आहे. या टीव्हीची किंमत 14,999 रुपये आहे.

पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारा Toshiba L50 सीरिज 32 इंचाचा हा एक उत्तम टीव्ही आहे. याची किंमत ही 14,999 रुपये ठेवण्यात आली असून तो ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे. यामध्ये Youtube, Netflix, Prime Video आणि Hungama Play सारखे ओटीटी अॅपचा लाभ घेता येणार आहे.

तसेच Samsung HD Reddy टीव्हीच्या 32 इंचामध्ये युजर्सला एचडी व्हिडिओचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये युएसबी पोर्ट दिला गेला असून त्याच्या मदतीने युएसबी ड्राइव्हचा उपयोग केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त टीव्हीत दोन एचडीएमआय पोर्ट ही दिले आहेत. ऑडिओसाठी यामध्ये 20 स्पीकर्स मिळणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif